इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचा इतिहासातील सर्वात मोठा दावा, थेट म्हटले, आम्ही इराणवर…

इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात नुकताच अमेरिकेकडून अत्यंत मोठा दावा करण्यात आला. अमेरिकेच्या या दाव्याने अत्यंत मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. इराणमधील स्थिती सध्या अत्यंत बिकट आणि वाईट आहे. त्यामध्येच अमेरिकेने दावा केला.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचा इतिहासातील सर्वात मोठा दावा, थेट म्हटले, आम्ही इराणवर...
US made huge claim war Iran
| Updated on: Mar 05, 2026 | 11:56 AM

इराण आणि अमेरिकेतील तणाव सध्या प्रचंड वाढला आहे. मोठे हल्ले सुरू असून इराण आणि इस्त्रायल दोन्ही देशाचे नागरिक बंकरमध्ये जीव वाचवून लपून बसले आहेत. यादरम्यानच अमेरिकेने मोठी चाल करत थेट भारताहून युद्ध सराव करून निघालेल्या इराणी युद्धनाैकेला श्रीलंंकेच्या हद्दीत टार्गेट करत बुडवले. ज्यावेळी अमेरिकेने हल्ला केला, त्यावेळी जहाजावर 180 सैनिक होते. त्यापैकी 87 सैनिकांचा जीव गेला तर काही जणांचा शोध सुरू आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच श्रीलंकेकडून तात्काळ बचावकार्य राबवण्यात आले. जे जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यासोबतच अमेरिकेने मान्य केले की, होय आम्हीच इराणी युद्धनाैकेला बुडवले. यानंतर आता इराण प्रचंड आक्रमक भूमिकेत बघायला मिळत आहे. इराणकडून अमेरिकेला आणि इस्त्रायलला थेट मोठी धमकी देण्यात आली. इस्त्रायलच्या परमाणु ठिकाणांवर हल्ला करण्याची धमकी इराणकडून देण्यात आल्याने जगात खळबळ उडाली.

यादरम्यान अमेरिकेकडून मोठे दावे केले जात आहेत. अमेरिकेने स्पष्ट शब्दात म्हटले की, पुढील चार ते पाच आठवडे युद्ध सुरू राहले. इराणच्या नाैसेनेकडून गुडघे टेकण्यात आली. आम्ही 20 पेक्षा जास्त इराणी जहाज बुडवले आहेत. आता त्यांची ताकद कमी होताना दिसत आहे. अजूनही अमेरिकन लष्कर या युद्धात उतरले नाही. जर गरज पडली तर अमेरिकन लष्कर जमिनीवर उतरून हल्ले करेल.

यासोबतच अमेरिकेकडून थेट दावा करण्यात आला की, लवकरच आम्ही इराणवर दाबा मिळू. अमेरिकेचे युद्ध सचिव पीट हेगसेथ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर संस्था त्यांच्या लढाऊ शक्तीने लवकरच इराणला रोखतील. विशेष म्हणजे जमिनीवर सैन्याच्या उपस्थितीशिवाय आम्ही इराणच्या हवाई आणि यासोबतच जलमार्गावरही नियंत्रण मिळू.

हा अत्यंत मोठा दावा पहिल्यांदाच अमेरिकेकडून करण्यात आला आहे. थेट इराणवर नियंत्रण मिळवण्याबद्दल त्यांनी थेट भाष्य केले. इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका अनेक क्षेत्रांना बसत आहे. भारतातून होणारी निर्यात जवळपास ठप्प झाली असून या युद्धामुळे जगातील जवळपास सर्वच देश अडचणीत सापडली आहेत. हे युद्ध तात्काळ थांबवण्याची मागणी केली जात आहे.

Follow Us