AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणवरील हल्ल्यासाठी भारतीय तळाचा वापर?, खळबळ उडवणारा दावा, थेट भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन..

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पेटला आहे. यादरम्यानच अमेरिकेने भारताहून इराणच्या दिशेने निघालेल्या इराणी युद्धनाैकेवर केलेल्या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली. या युद्धनाैकेत इराणचे 180 सैनिक तैनात होते. ज्यापैकी 87 जणांचा जीव गेला.

इराणवरील हल्ल्यासाठी भारतीय तळाचा वापर?, खळबळ उडवणारा दावा, थेट भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन..
Iran War
| Updated on: Mar 05, 2026 | 10:57 AM
Share

अमेरिका इराण युद्धातील तणाव वाढला आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. इराणच्या मोठ्या शहरांना टार्गेट करत हल्ले करण्यात आली. जग महायुद्धाच्या स्थितीत आहे. कारण अमेरिका आणि इराणने मिळून हल्ले केल्यानंतर इराणकडूनही अशा काही देशांवर हल्ले केले ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहे. फक्त अमेरिकेचे लष्कर तळच नाही तर थेट अमेरिकन दूतावासावरही हल्ले केले जात आहेत. पाकिस्तान, दुबईसह अन्य काही देशात असलेल्या अमेरिकन नागरिकांना लवकरात लवकर हे देश सोडण्याच्या सूचना अमेरिकेकडून देण्यात आल्या. दुबईमध्ये अमेरिकन दूतावासाला टार्गेट करण्यात आले. थेट मोठ्या क्षेपणास्त्रांसह हल्ला करण्यात आला. अमेरिकेने स्पष्ट शब्दात सांगितले की, हे युद्ध पुढील काही आठवडे सुरू असेल. यासोबतच इराणकडून बंद करण्यात आलेला महत्वाचा समुद्री मार्ग अमेरिकेने सुरू करण्याचा निर्णय घेतला असून जाणाऱ्या जहांना आम्ही संरक्षण देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

या युद्धादरम्यानच भारताबद्दल अत्यंत मोठा दावा करण्यात आला. इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणमधील महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. आता त्यांना नव्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी भारताच्या बेसची मदत घ्यावी लागत आहे. हा दावा थेट US च्या एका कर्नलने केला. या दाव्याने मोठी खळबळ उडाली आणि अमेरिका खरोखरच भारतीय बेसचा आधार इराणवर हल्ले करण्यासाठी घेत आहे का? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर आता भारताने थेट आपली भूमिका मांडली आहे.

माजी अमेरिकेन कर्नल डगलस मॅकग्रेगर यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले की, मध्य पूर्वमधील अमेरिकेचे बेस उद्ववस्थ झाल्याने अमेरिका आता भारताच्या बंदरांवर अवलंबून आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. भारताने म्हटले की हा दावा पूर्णपणे खोटा आहे. भारताने सर्वच देशांना शांतता राहण्याचे आवाहन केले. तणाव कमी करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राथमिक ठेवले पाहिजे, याकरिता भारत आग्रही आहे.

इतिहासाप्रमाणे भारत आपली जमीन कोणत्याही लष्कराला देत नाही आणि आताही भाररत तेच फॉलो करत आहे. यामुळे भारताने अमेरिकेच्या लष्कराला आपली बेस दिल्याचा दावा हा पूर्णपणे खोटा आहे. आज इराण आणि अमेरिकेच्या युद्धाला 6 दिवस पूर्ण झाली आहेत. हिंद महासागरात अमेरिकेने इराणची युद्धनाैका बुडवल्याने भारत चिंतेत आहे. ही युद्धनाैका भारताच्या विशाखापट्टनम येथून युद्ध सराव करून इराणकडे निघाली होती. श्रीलंकेच्या समुद्र हद्दीत हा हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये आतापर्यंत 87 इराणी सैनिकांचा जीव गेला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...