अमेरिकेचा मोठा हल्ला, ओमान खाडीत रात्री घडले भयंकर, थेट हेलफायर क्षेपणास्त्रे..
इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग अस्थिर आहे. परिस्थिती चिघळताना दिसत आहे. त्यामध्येच नुकताच धक्कादायक घटना घडली. त्याने होर्मुज खाडी आणि ओमान खाडीत तणाव वाढल्याचे दिसत आहे. अमेरिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली.

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव कमी व्हायचा तर अधिक वाढताना दिसत आहे. व्हाईट हाऊसमध्ये या युद्धाबाबत महत्वाची बैठक झाली. होर्मुज खाडी तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून ठप्प आहे. जोपर्यंत होर्मुज खाडी खुली होणार नाही तोपर्यंत ऊर्जेचे मोठे संकट असणार आहे. जागतिक बाजारात होर्मुज खाडी खुली झाली तर कच्च्या तेलाच्या किमतीमध्येही घसरण बघायला मिळेल. इराणला मोठी नाकेबंदी अमेरिकेने केली. इराणच्या दिशेने आणि इराणमधून एकही जहाज अमेरिकेच्या या तटबंदीमुळे बाहेर पडू शकत नाही. यादरम्यानच आता पुन्हा होर्मुज खाडीजवळ मोठा तणाव वाढला आहे. ज्याने एकच खळबळ उडाली. अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव असतानाच ओमान खाडीत एक अत्यंत मोठी कारवाई करण्यात आली. अमेरिकेने होर्मुज खाडीत असे काही केले की, जगात हाहाकार उडाला. अमेरिकेचे हे पाऊल जगासाठी घातक ठरू शकते.
अमेरिकेच्या लष्कराने एका व्यापारी मालवाहू जहाजावर थेट हेलफायर क्षेपणास्त्रे टाकले. यासोबतच अमेरिकेने मोठा दावा केला. अमेरिकेचा दावा आहे की, आम्ही त्या जहाजाला वारंवार थांबण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी आमच्या संकेताकडे दुर्लक्ष केले. अमेरिकेच्या नौदल नाकेबंदीचे उल्लंघन करत इराणी बंदरात घुसण्याचा प्रयत्न केला.
अमेरिका आणि इराण यांच्यात काही मुद्द्यामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, तणाव कायम दिसतोय. यादरम्यानच अमेरिकेचे रक्षा मंत्री पीट हेगसेथ यांनी मोठा इशारा देत म्हटले की, जर वाटाघाटीतून मार्ग निघाला नाही तर अमेरिकेचे लष्कर पुन्हा एकदा इराणविरोधात मोठी कारवाई करण्यास तयार आहे. अमेरिकेच्या या इशाऱ्याने स्पष्ट होते की, जर चर्चेतून मार्ग निघाला नाही तर पुन्हा एकदा युद्धाला सुरूवात होऊ शकते.
अमेरिकेने जहाजावरील हल्ल्याबाबत बोलताना म्हटले की, गांबियाच्या झेंडा लावलेले एक मालवाहू जहाज लियान स्टार ओमानच्या खाडीतून इराणच्या बंदराकडे जात होते. जहाज जागतिक जल क्षेत्रातून जात होते. मात्र, त्याने अमेरिकेची तटबंदी तोडली. आम्ही रात्रभर त्याला रोखण्याकरिता 20 पेक्षा जास्त वेळा इशारे दिले. पण आम्हाला जहाजाकडून कोणताही प्रसिसाद मिळत नव्हता. त्यानंतर आम्ही जहाजावर हेलफायर मिसाईल टाकले. या हल्ल्यानंतर जहाज पुढे जात नाहीये.