Lindsey Graham : भारताबद्दल खूप वाईट बोललेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या माणसाचा अचानक मृत्यू
Lindsey Graham : ते वर्ष 2003 पासून अमेरिकी सिनेटमध्ये साऊथ कॅरोलिनाचं प्रतिनिधीत्व करत होते. फॉरन पॉलिसी, नॅशनल सेफ्टी आणि न्यायिक विषयात मामलों रिपब्लिकन पार्टीच्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांची गणना व्हायची.

रिपब्लिकन पक्षाचे खासदार आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी लिंडसे ग्राहम यांचं निधन झालं आहे. ते 71 वर्षांचे होते.लिंडसे ग्राहम नुकतेच युक्रेनवरुन परतले होते. अचानक आजारी पडल्यामुळे त्यांचं निधन झालं. लिंडसे ग्राहम दक्षिण कॅरोलिनाचे खासदार होते. ह्दयविकारामुळे त्यांचं निधन झालं.अचानक आजारी पडल्यामुळे लिंडसे ग्राहम यांचं शनिवारी संध्याकाळी निधन झालं असं त्यांच्या कार्यालयाने म्हटलं आहे. लिंडसे ग्राहम हे भारतविरोधात बरळणाऱ्यांपैकी एक होते. भारताची रशियाकडून सुरु असलेली तेल खरेदी त्यांना अजिबात मान्य नव्हती. म्हणून त्यांनी भारतावर 500 टक्के टॅरिफ लावा म्हटलं होतं.
लिंडसे ग्राहम अमेरिकन राजकारणातील एक महत्वाची व्यक्ती होते. ते वर्ष 2003 पासून अमेरिकी सिनेटमध्ये साऊथ कॅरोलिनाचं प्रतिनिधीत्व करत होते. फॉरन पॉलिसी, नॅशनल सेफ्टी आणि न्यायिक विषयात मामलों रिपब्लिकन पार्टीच्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांची गणना व्हायची. सिनेटमध्ये येण्याआधी त्यांनी अमेरिकी प्रतिनिधी सभेत चारवर्ष काढली होती. 1995 साली ते पहिल्यांदा काँग्रेसमध्ये गेले. आपल्या दीर्घ राजकीय करिअरमध्ये लिंडसे ग्राहम यांनी महत्वाच्या समित्यांवर काम केलं. ते सिनेटच्या न्यायिक समितीचे अध्यक्ष सुद्धा होते.
निधन होण्याच्या एकदिवस आधी युक्रेनमध्ये होते
आंतरराष्ट्रीय कूटनितीमध्ये सक्रीय असताना लिंडसे ग्राहम यांचं निधन झालं. निधन होण्याच्या एकदिवस आधीच ते युक्रेनची राजधानी कीवमध्ये राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्की यांना भेटले होते. या बैठकीत युक्रेनला आवश्यकता असलेली एअर डिफेन्स सिस्टिम आणि रशियाविरुद्ध प्रस्तावित निर्बंधांबद्दल चर्चा झाली. रशियाला शांतता चर्चेसाठी तयार करण्यात चीन महत्वाची भूमिका बजावू शकतो असं लिंडसे म्हणाले. रशियावर अजून कठोर प्रतिबंध आणि युक्रेनला लष्करी दृष्ट्या अजून बळकट करुन रशियाला चर्चेच्या टेबलावर आणता येईल असं त्यांचं मत होतं.
मी माझा आणि इस्रायलचा चांगला मित्र गमावला
“मी माझा आणि इस्रायलचा चांगला मित्र गमावला” असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लिंडसे ग्राहम यांच्याबद्दल म्हटलं आहे. “ग्राहम यांना इस्रायलच्या सुरक्षेची चांगली समज होती. ग्राहम यांनी आपलं आयुष्य अमेरिकेला भक्कम बनवण्यासाठी खर्ची केलं. इस्रायल-अमेरिका मैत्री दृढ करण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली” असं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.