भारताचा ज्याची प्रतिक्षा तेच घडलं, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट बदलली भूमिका, रशियाच्या..
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून भारताविरोधात सातत्याने भूमिका घेताना दिसत आहेत. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी पलटी मारल्याचे बघायला मिळतंय. त्यांनी टॅरिफमध्ये मोठी सवलत दिल्याचे बघायला मिळतंय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प केल्या काही दिवसांपासून टॅरिफबद्दल भूमिका घेत आहे. अमेरिकेच्या संसदेत टॅरिफबाबत विधेयक मंजूर करण्यात आला. रशियाशी संबंधित अनेक निर्बंध, प्रतिबंध आणि शुल्कांमधून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार पलटी मारतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी मारलेल्या या पलटीमुळे भारताचा फायदा झाला. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशावर 100 टक्के टॅरिफ लावण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प होते. त्यात भारताचाही समावेश होता. टॅरिफचे मोठे संकट भारतावर होते. टॅरिफ भारतावर लागणार होता. भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो. ट्रम्प यांनी एका अधिकृत आदेशाद्वारे ही घोषणा केली. हे निर्बंध आणि शुल्क एका अशा कायद्यांतर्गत लागू होणार होते, ज्यावर ट्रम्प यांनी स्वतः गेल्या महिन्यात स्वाक्षरी केली होती.
हे निर्बंध लागू होण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा रशियाबाबतची त्यांची भूमिका बदलताना दिसत आहेत. रशियाविरोधात अमेरिका मोठी कारवाई करत होता. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर त्यांच्याकडून निर्बंध लादली जात होती. मोठा टॅरिफ लावला जात होता.
अचानक अमेरिकेची रशियाबद्दलची भूमिका बदलल्याचे बघायला मिळतंय. रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांवर आर्थिक दबाव निर्माण करण्यासाठी मोठा कायदा संसदेत अमेरिकेने पास केला. या कायद्यानुसार, रशियन तेल खरेदी करणारे मोठे पाच खरेदीदार देश यांच्यावर टॅरिफ लागणा होता. त्यात भारतासह चीनचा समावेश होता.
रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 30 दिवसांच्या आत 100 टक्के टॅरिफ लादला जाणार होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाने भारताला मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावात आहेत. त्यातच भारतावर टॅरिफचे मोठे संकट होते. अखेर भारतावर टॅरिफ लागणार नसल्याचे स्पष्ट झाले. हा भारतासाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल. भारताने अगोदरच स्पष्ट केले की, भारताने कोणाकडून काय खरेदी करावे, हा आमचा निर्णय आहे.