डोनाल्ड ट्रम्प यांनी खेळ बिघडवला, रशिया अन् युक्रेनच्या युद्धात युरोपची एन्ट्री होणार? नेमकं काय घडलं?
रशिया आणि अमेरिकेत डिझेल खरेदीसाठी करार झाला आहे. या करारावर झेलेन्स्की यांनी टीका केली आहे. या करारातून मिळणारा पैसा पुतिन युद्धात वापरतील, असा दावा त्यांनी केला आहे.

अमेरिका आणि रशियामध्ये डिझेल खरेदीवरून मोठा करार झाला आहे. परंतु हा करार युक्रेनला खटकला आहे. या करारावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अमेरिका आणि रशियाच्या डिझेल खरेदीच्या करारातून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना पैसे मिळतील, असा दावा राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. या करारामुळे मिळणारा पैसा पुतिन हे युद्धासाठी वापरतील, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. यानंतर झेलेन्स्की यांनी थेट युरोपकडे मदत मागितली आहे. त्यामुळे आता रशिया आणि युक्रेनच्या युद्धात युरोपची एन्ट्री होणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
झेलेन्स्की यांनी ब्रुसेल्सच्या युरोपियन युनियन शिखर परिषदेत हे विधान केलं. एकीकडे रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरूच आहे. दुसरीकडे युक्रेनला अमेरिकेकडून शस्त्रांच्या मदतीत कपात झाल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, झेलेन्की यांनी म्हटलं की, रशियाकडून डिझेल खरेदी करण्याचा करार हा होर्मुझ सामुद्रधुनीमुळे निर्माण झालेल्या संकटाचा परिणाम कमी करण्यासाठी पुरेसा नाही. या करारातून रशियाला अतिरिक्त निधी मिळेल. दोन्ही देशात झालेला करार संकाटाचा सामना करण्यासाठी पुरेसा ठरणार नाही. खरंतर या करारातून पुतिन यांच्या खिशातच अधिक पैसा जाईल. या पैशांचा उपयोग पुतिन हे युद्धासाठी वापरतील’.
काही दिवसांपूर्वी युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला केला होता. त्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनवर निशाणा साधला होता. या हल्ल्यामुळे जागतिक तेलाच्या किंमती वाढत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं होतं. ट्रम्प म्हणाले होते की, युक्रेनकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुळे जागतिक तेलाच्या किंमती वाढू लागल्या आहेत. त्यांच्याकडून सातत्याने हल्ले होणे ही लज्जास्पद बाब आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, रशिया आणि युक्रेन यांच्याकडून एकमेकांच्या प्रकल्पावर हल्ले न करण्याबाबत सहमती झाली आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांत युक्रेनने रशियाच्या एका तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला केला. त्यावेळी झेलेन्स्की म्हणाले होते की, आम्ही ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे’.
