भारताची झोप उडणार, अमेरिका 100 टक्के टॅरिफ लादणार? ट्रम्प येत्या 10 दिवसांत काय निर्णय घेणार?
अमेरिका भारतावर 100 टक्के टॅरिफ लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताकडून चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत ट्रम्प यांच्याकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

पश्चिम आशियातील तणावामुळे जगात अस्थिर वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प धडाधड निर्णय घेत आहे. अमेरिका लवकरच भारताच्या विरोधात 100 टॅरिफ लावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात. पंतप्रधान मोदी हे पुढील महिन्यात 16-18 नोव्हेंबरच्या कालावधीत मनीला येथील आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही नेत्यांच्या भेटीच्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या भेटीत अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणाऱ्या टॅरिफवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची जून महिन्यात फ्रान्सच्या जी-7 बैठकीत भेट होण्याची शक्यता आहे. एकीकडे अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांच्या विरोधात 100 शुल्क लावणारा कायदा मंजूर केलाय. भारताने या मुद्य्यावरून चिंता व्यक्त केली आहे. नवा कायदा मंजूर झाल्यामुळे भारत यातून सूट देण्याची मागणी करत आहे. या कायद्यांत राष्ट्राध्यक्षांना सूट देण्याचा अधिकार आहे. आगामी भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी यबाबत चर्चा होऊ शकते. या भेटीत टॅरिफवरून भारत चिंता व्यक्त करू शकतो. भारत आणि अमेरिकेच्या व्यापारी करारावेळी महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेत नेमकी काय चर्चा होतेय?
रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांना 100 टक्के टॅरिफ लावण्याचा विचार अमेरिका करत आहे. याबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 10 दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता आहे. या यादीत भारत आणि चीनसहित इतर देशांचा देखील समावेश आहे. ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये गोर म्हणाले, ‘हा कायदा ट्रम्प यांना रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दंड आकारण्याचा अधिकार देतो. सदर कायदा कोणत्याही देशाला लक्ष्य करण्याचा नाही. हा कायदा भारताला लागू होईल का, हे विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी हे सर्वकाही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अवलंबून असल्याचे सांगितले. ‘डोनाल्ड ट्रम्प यांना येत्या 10 दिवसांत निर्णय घ्यावा लागेल. या कायद्याअंतर्गत ट्रम्प यांनी कोणत्याही देशवर निर्बंध लादले नाहीत. तसेच हा कायदा लागू करण्यासाठी ट्रम्प यांना 30 दिवसांचा अवधी मिळतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
