AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनने ज्याचा विचार केला नाही तेच भारताने केले, मोठा दणका, थेट लडाखच्या दाव्यावर..

चीन आणि भारताचे संबंध मागील काही दिवसांचा विचार करता सुधारली आहेत. मात्र, पुन्हा चीनने भारताविरोधात भूमिका घेण्यास सुरूवात केली. भारतानेही चीनला मोठा दणका देत तोंडावर पाडल्याचे बघायला मिळत आहे.

चीनने ज्याचा विचार केला नाही तेच भारताने केले, मोठा दणका, थेट लडाखच्या दाव्यावर..
Narendra Modi and Xi Jinping
| Updated on: Oct 13, 2026 | 6:04 PM
Share

चीनची दुटप्पी भूमिका बघायला मिळत आहे. चीन एकीकडे भारताला चांगला मित्र सांगतो. यासोबतच ज्यावेळी भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला, ज्यावेळी भारताच्या बाजूने चीन ठामपणे उभा होता. भारतात झालेल्या परिषदेत चीनचे अध्यक्ष शी.जिनपिंग उपस्थित राहिले. मात्र, आता दुसऱ्या बाजूला भारताविरोधात काट्या करण्यास चीनने सुरूवात केली. लडाखबद्दल पायाखालची जमीन सरकणारा दावा चीनने केला. लडाख हा चीनचा भाग असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला. चीनच्या या दाव्याने दोन्ही देशातील संबंध तणावात येऊ शकतात. यासोबतच अरूणाचल प्रदेशमध्ये अगोदरच तणाव हा बघायला मिळतोय. त्यातच लडाखबद्दल हैराण करणारे विधान चीनकडून करण्यात आले. चीनच्या या विधानाला भारताने सडेतोड उत्तर देत त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी बीजिंगमध्ये एका पत्रकार परिषदेत म्हटले, चीनने भारताद्वारे एकतर्फी आणि बेकायदेशीरपणे तयार केलेल्या तथाकथित केंद्र शासित प्रदेश लडाखला कधीही मान्यता दिलीच नाही.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे की, लडाख हा केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे. चीनने कितीही वेळा हे नाकारले तरीही वस्तूस्थिती काही बदलू शकत नाही किंवा बदलणार नाही. लडाखच्या अधिकृत नकाशावर 28 ठिकाणे आणि भौगोलिक वैशिष्ट्ये दर्शवण्याबाबत चीनने दिलेल्या प्रतिक्रियेला उत्तर म्हणून भारताने हे विधान केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, ज्या प्रसिद्धीपत्रकाचा संदर्भ दिला जात आहे. ते गृह मंत्रालयाने जारी केलेले असून ते स्वतःच सर्व काही स्पष्ट करणारे आहे. सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकृत नकाशावर केंद्रशासित प्रदेश लडाखमधील 28 ठिकाणे आणि भौगोलिक वैशिष्ट्ये ही त्यांच्या प्रमाणित नावांनी दर्शविण्यात आली आहेत.

अधिकृत नकाशांवर या ठिकाणांची अधिकृतपणे नोंद करणे, त्यांची अचूक ओळख सुनिश्चित करणे आणि त्याबाबत जनजगृती करणे हा याचा उद्देश आहे, असल्याचेही म्हटले. गेल्या काही दिवसांपासून चीन शांत होता. मात्र, आता पुन्हा भारताचा डिवचण्याचे काम चीनने सुर केल्याचे बघायला मिळतंय. चीनच्या या भूमिकेनंतर भारताने चीनची कान उघडणी करून चांगलेच सुनावले आहे. अरूणाचल प्रदेशमध्येही चीनकडून असेच प्रकारे केले जात आहेत. अरूणाचल प्रदेशचा भाग चीनकडून दाखवला जातो.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा