संपूर्ण लडाख आमचे, भारताने केला अवैधपणे कब्जा, चीनच्या दाव्याने खळबळ, दोन्ही देशांच्या संबंधात तणाव

२ ऑक्टोबर रोजी भारताने लडाखमधील २८ सामरिक ठिकाणे आणि भौगोलिक वैशिष्ट्ये औपचारिकपणे निश्चित केली होती, ज्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (LAC) गोगरा आणि हॉट स्प्रिंगसारख्या प्रमुख सीमा विवादांचा समावेश आहे.

संपूर्ण लडाख आमचे, भारताने केला अवैधपणे कब्जा, चीनच्या दाव्याने खळबळ, दोन्ही देशांच्या संबंधात तणाव
jinping and modi
| Updated on: Oct 13, 2026 | 4:46 PM

चीनने एक असा दावा केला आहे ज्याने भारत आणि चीनमध्ये पुन्हा तणाव निर्माण केला आहे. चीनने लडाखमधील २४ महत्वाच्या स्थान आणि भौगोलिक क्षेत्रांचे नामकरण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा मंगळवारी कठोर शब्दात समाचार घेतला आहे आणि संपूर्ण लडाख आपला असल्याचा दावा चीनने केला आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी बीजिंगमध्ये एका पत्रकार परिषदेत म्हटले की चीनने भारताद्वारे एकतर्फी आणि बेकायदेशीरपणे तयार केलेल्या तथाकथित केंद्र शासित प्रदेश लडाखला कधीही मान्यता दिलेली नाही. ते म्हणाले भारताने लडाखवर एकतर्फी आणि अवैधपणे कब्जा केला आहे.

ते म्हणाले की, भारताने तथाकथितपणे नामकरण करुन प्रांतासाठी नविन नावांची घोषणा केली असून त्याला चीनचा तीव्र विरोध आहे. लडाखमध्ये २८ जागी आणि भौगोलिक क्षेत्रांसाठी गृहमंत्रालयाच्या वतीने निश्चित केलेल्या नावांची घोषणा संबंधी एका प्रश्नांचे उत्तर देत होते.ते म्हणाले भारताचे हे पाऊल बेकायदेशीर आणि अमान्य आहे. यामुळे तथ्यात कोणताही बदल होणार नाही की भारत-चीन सीमेच्या पश्चित क्षेत्रासंबंधी भागात काम चीनचे राहिलेले राहिले आहेत असेही ते म्हणाले.

Loading...

भारताने 28 ठिकाणे नामांकित केली

भारताने २ ऑक्टोबर रोजी लडाखमध्ये २४ धोरणात्मक स्थान आणि भौगोलिक विशेषतता असलेल्या क्षेत्रांना औपचारिक रुपाने चिन्हीत केले होते. यात वास्तविक नियंत्रण रेषेवरील गोगरा आणि हॉट स्प्रिंग सारख्या मुख्य सीमावादातील स्थानांचा समावेश आहे.या स्थानांना भारताच्या अधिकृत मानचित्रात समाविष्ठ करण्यात आले होते. लडाख प्रशासनाच्या चर्चेनंतर सरकारने उचलेल्या या पावलांचा उद्देश्य अधिकृत मान चित्रणाला व्यव्यवस्थित करणे, ठिकाणांची ओळख निश्चित करणे आणि संवेदनशील क्षेत्रा संदर्भात लोकांमध्ये जागरुकता वाढवणे हा आहे.

गोगरा आणि हॉट स्प्रिंगचा देखील समावेश

गोगरा आणि हॉट स्प्रिंग त्या महत्वाच्या जागांपैकी एक आहे, जेथे २०२० मध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात तणाव निर्माण झाला होता. एलएसीजवळ भारताच्या गस्तीसाठी ही जागा महत्वाची आहे. पूर्व लडाखमध्ये सीमेवर तणाव ५ मे २०२० रोजी पँगोंग क्षेत्रात भारतीय आणि चीनी सैनिकात चकमक झाली होती. दोन्ही पक्षांनी २०२२ मध्ये सैनिकांना मागे हटवण्याची प्रक्रिया सुरु केली होती.

ओळख दिलेल्या ठिकाणांमध्ये यांचा समावेश

भारताने नाव आणि ओळख दिलेल्या ठिकाणांमध्ये अलीशा गिरी पर्वताचे शिखर, ब्रांगसा, चापचिंगल खिंड, कनिष्क शिखर, करुण पीर पर्वत, कुकसेल, मार्तंड गिरी, पारपिक हिमनदी, स्कामारी हिमनदी, शाचमिरिक खिंड, शाकोरगा दरी, झोरावर शिखर, देहरा कॅम्पस आणि द्राक कार्पो यांचा समावेश आहे. या यादीत जलमोरी, कुमारयान पॉईंट, पांगलुंग, रिंचेन झांगपो, शाक्यश्री गिरी, गुरू रिंपोचे, शामल लुंगपा (१९५० च्या दशकात गस्त आणि सैन्याच्या हालचालींसाठी वापरला जाणारा मार्ग), यांगपा नदी, मार्पा लोटसावा री, मिलारेपा कांग्री, शिव री आणि महेश्वर री यांचाही समावेश आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us