Jalgaon DCC: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीतच धुसफूस, उन्मेष पाटील बंडोखारांच्या बूथवर पोहचताच…
Unmesh Patil on Jalgaon DCC Bank Election: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीमधील तणाव वाढलेला दिसून येत आहे. मतदानाच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील बंडखोरांच्या बूथवर पोहचल्याने तणाव वाढला आहे. चाळीसगाव येथील बंडखोरांच्या बुथवर उन्मेष पाटील थांबून असल्यामुळे महायुतीतील तणावात मोठी भर पडली आहे.

खेमचंद कुमावत, प्रतिनिधी, टीव्ही 9, मराठी : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या मतदानादिवशी चाळीसगाव सोसायटी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवारांच्या बुथवर शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील थांबून असल्यामुळे महायुतीती तणावात मोठी भर पडली आहे. निवडणूक प्रक्रियेत कुठेही प्रत्यक्ष सक्रिय दिसलेले माजी खासदार उन्मेष पाटील मतदानाच्या दिवशी थेट शिंदे सेनेच्या बंडखोरांच्या बूथवर दिसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मंगेश चव्हाण यांनाच आव्हान
चाळीसगाव सोसायटी मतदारसंघातून भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शिंदे सेनेचे दोन बंडखोर उमेदवार मैदानात असून, त्यांच्याकडून मंगेश चव्हाण यांना आव्हान दिले आहे. महायुतीचा घटक असलेल्या शिंदे सेनेचे नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील हे थेट बंडखोरांच्या बूथवर दिसल्याने चाळीसगावमधील राजकीय समीकरणे आणि महायुतीतील अंतर्गत तणाव मतदानाच्या दिवशी पुन्हा चर्चेत आला आहे.
मुक्ताईनगरमध्ये खडसे विरुद्ध पाटील सामना
जिल्हा बँक निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर मतदान केंद्रावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आमने सामने आले. मतदान केंद्रावर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या प्रोटोकॉलवर आमदार चंद्रकांत पाटलांनी आक्षेप घेतला. प्रोटोकॉल च्या माध्यमातून मतदारांवर दबाव टाकण्याचा आमदार चंद्रकांत पाटलांनी व्यक्त संशय केला. तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे तीन ठिकाणी मतदान असल्याचाही आमदार चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप केला.तर प्रोटोकॉल आम्हाला शासनाकडून मिळालेला सुरक्षेसाठी प्रोटोकॉल हा माझ्यासोबतच त्यात गैर काय रक्षा खडसे यांनी सवाल उपस्थित केला.
मंत्री गुलाबराव पाटील यांचे मोठे वक्तव्य
चाळीसगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उन्मेश पाटील बंडखोर उमेदवाराच्या बूथवर थांबून आहेत, यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जागेवरून नाराजी होती हे मान्य आहे मात्र त्यांनी बंडखोरी केले आम्ही महायुतीचा धर्म पाळला आहे. याचा अर्थ आम्ही महायुतीच्या बाहेरच्या माणसाला मतदान करू असा होत नाही, असे पाटील म्हणाले. त्यांनी महायुतीत कुरबुर असली तरी इतर उमेदवाराला मतदान होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
