मोठी बातमी! इराण अमेरिका युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट नरेंद्र मोदी यांना फोन, तब्बल 40 मिनिटे..

इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक केले. हा पाकिस्तानसाठी अत्यंत मोठा झटका नक्कीच म्हणावा लागेल.

मोठी बातमी! इराण अमेरिका युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट नरेंद्र मोदी यांना फोन, तब्बल 40 मिनिटे..
Donald Trump and Narendra Modi
| Updated on: Apr 17, 2026 | 8:08 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीला यावेळी पाकिस्तान धावून आला. इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता पाकिस्तानची नुसती लुडबुड सुरू आहे. एकदा तेहरानमध्ये तर काही तासात वॉशिंग्टनला अशी पाकिस्तानची भूमिका आहे. पाकिस्तान आणि अमेरिका जवळ आल्याची चर्चा असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धक्का देत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक केले. हेच नाही तर आम्ही खूप जास्त चांगले मित्र आहोत. काही मिनिटे आमच्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. इराण आणि अमेरिका शांतता करार चर्चा सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना फोन केला. जवळपास 40 मिनिटे सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी चर्चा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये मी माझे मित्र नरेंद्र मोदी यांच्यासोबत पश्चिम आशियातील संघर्षाच्या परिस्थितीवर खूप जास्त चांगली चर्चा केली.

आमच्या दोघात एक चांगले संभाषण झाले. ते माझे खूप जास्त जवळचे मित्र आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नक्की काय चर्चा झाली हे कळू शकले नाही. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल संवाद झाल्याचे म्हटले. त्यांनी या पोस्टची सुरूवात दोस्त.. डोनाल्ड ट्रम्प… याने केली.

पाकिस्तान युद्धबंदी कराराकरिता पुढाकार घेत आहे. कधी इराणसोबत चर्चा तर कधी अमेरिकेसोबत चर्चा करत आहे. मात्र, पाकिस्तानचे काैतुक करण्याऐवजी डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांचे काैतुक केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कायमच सांगितले जाते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत.

इराण आणि अमेरिका युद्धात भारताची अगदी स्पष्ट भूमिकी राहिली. कोणत्याही परिस्थितीमध्ये शांतता प्रस्तापित व्हायला हवी ही भूमिका भारताची होती. इस्त्रायल, इराण आणि अमेरिका या तिन्ही देशांसोबत भारताचे जवळचे संबंध आहेत. प्रत्यक्षात युद्धात न पडता मार्ग नक्की कसा काढता येईल, यावर भारताने अधिक जोर दिल्याचे बघायला मिळाले.

 

Follow Us