AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांची इराणसोबतच्या युद्धात अत्यंत मोठी घोषणा, थेट युद्धविराम…

इराण आणि अमेरिका युद्धाबाबत अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली. युद्धबंदी करार अत्यंत जवळ पोहोचल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. इराण आणि अमेरिका युद्धामुळे पूर्ण जग वैतागले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांची इराणसोबतच्या युद्धात अत्यंत मोठी घोषणा, थेट युद्धविराम...
Donald Trump
| Updated on: Apr 17, 2026 | 7:40 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष एका महिन्यापेक्षा अधिक काळ चालला. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध सुरू होताच सांगितले होते की, हे युद्ध फार काळ टिकणार नाही. पण उलटे झाले. इराणने ज्या पद्धतीने पलटवार केला, त्यानंतर एकच खळबळ उडाली. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. होर्मुज खाडीत अजूनही तणाव आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच अत्यंत मोठी घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत म्हटले की, इराण जवळपास सर्वच गोष्टींवर तयार आहे. इराणने आपला समृद्ध युरेनियमचा साठा सोपवण्यासही सहमती दर्शवली आहे. सहा आठवड्यांच्या संघर्षानंतर शांतता कराराच्या अत्यंत जवळ पोहोचलो आहोत. आता फक्त दोन्ही बाजूंनी एकत्र येऊन समोरासमोर बसून चर्चा करणे शिल्लक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, तेहरान अण्वस्त्रे बनवण्यासाठी वापरू शकेल अशी युरेनियम साठे ते आम्हाला परत देण्यास तयार आहेत.

ते जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर सहमत झाले आहेत. आता चर्चेसाठी बसणे फक्त शिल्लक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी कराराच्या अत्यंत जवळ पोहोचल्याचे म्हटले. हेच नाही तर जवळपास गोष्टींवर सहमती झाल्याचेही त्यांनी म्हटले. खरोखरच इराण आपले युरेनियम साठे अमेरिकेला देणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प इराणसोबतच्या युद्धबंदी करारात पहिल्यांदाच सकारात्मक दिसले.

यादरम्यानच्या संवादात त्यांनी कुठेही इराणला धमकी दिली नाही, ही विशेष बाब आहे. आता इराण आणि अमेरिका कराराच्या अत्यंत जवळ असल्याचे बघायला मिळत आहे. इस्लामाबादमध्ये इराणसोबत करार होऊन तो अंतिम झाल्यास आपण पाकिस्तानला जाऊ शकतो असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

इराण आणि अमेरिका युद्धबंदी करार कोणत्याही क्षणी होऊ शकतात. दोन्ही देशांमध्ये लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका युद्धात कोणीही देश पडण्यास तयार नव्हता. अमेरिकेने होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. अमेरिकेने होर्मुज खाडीत मोठी नाकेबंदी केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...