
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका मागून एक धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत. त्यांच्या निर्णयाचा परिणाम जगावर होतोय. डोनाल्ड ट्रम्प यांना आता कोणीतरी रोखले पाहिजे, नाही तर संपूर्ण जगाला वाईट परिणाम भोगावे लागतील, हे स्पष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या निर्णयामुळे जग आजच्या घडीला महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकच्या सैन्याने वेनेजुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यासह त्यांच्या पत्नीला मध्यरात्री बेडरूममधून अटक केली आणि थेट अमेरिकेत आणले. त्यानंतर थेट ग्रीनलॅंडला अमेरिका त्यांच्या देशावर ताबा घेईल, अशी धमकी देण्यात आली. हेच नाही तर इराणमध्ये सध्या असलेल्या परिस्थितीमध्येही अमेरिका हस्तक्षेप करताना दिसत आहे. इराणने अगोदरच सांगितले की, आमच्या देशाच्या सुरक्षेमध्ये कोणीही आले तर त्याचा हात कापले जातील. अमेरिकेने यासोबतच मोक्सिको आणि कोलंबियालाही धमकावले आहे.
मेक्सिकोमध्ये जमिनीवरून हल्ले केली जातील, असे अमेरिकेने म्हटले. डोनाल्ड ट्रम्प आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे वागणे पाहून आपण जगाचा देव असल्याचे त्यांच्याकडून दाखवले जातंय. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आंतराष्ट्रीय कायद्यांना केराची टोपली दाखवली जात आहे.
ज्यावेळी त्यांनी वेनेजुएलावर कारवाई केली, त्यावेळी त्यांनी आंतराष्ट्रीय कायद्याला फाट्यावर मारले. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच आता मोठे विधान करत म्हटले की, त्यांच्या शक्ती फक्त एकच व्यक्ती रोखू शकतो… तो म्हणजे ते स्वत: बाकी त्यांना कोणीही रोखू शकत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, लोकांना त्रास देण्याबद्दल ते विचारही करत नाहीत.
गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा तूफान रंगत आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याप्रकारे वेनेजुएलावर अतिक्रमण केले आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याकरिता थेट त्यांच्या देशाच्या अध्यक्षाला उचलून आणले. डोनाल्ड ट्रम्प यांनी एकप्रकारे चीन आणि रशियाला मोठी ताकद दिल्याची चर्चा आहे. यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, हे खरे नाहीये. आम्हाला त्यांचा धोका होता, म्हणून आम्ही असे केले.