AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातून तो एक फोन न आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट, खळबळजनक दावा, थेट 500 टक्के टॅरिफ..

डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर भारताविरोधात थेट भूमिका घेतान दिसत आहेत. कायमच भारत आणि अमेरिकेचे संबंध तसे चांगले राहिले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे संबंध अधिक तणावात असल्याचे बघायला मिळतंय.

भारतातून तो एक फोन न आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट, खळबळजनक दावा, थेट 500 टक्के टॅरिफ..
Donald Trump India
| Updated on: Jan 09, 2026 | 12:07 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, याचा अजिबातच भरोसा नाही. काही दिवसांपूर्वीच भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला. सध्या भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू आहे. आता अमेरिकेकडून मोठा दावा करण्यात आला. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी दावा केला केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणताही फोन न असल्याने व्यापार करार होऊ शकले नाहीत. त्यांनी म्हटले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला नाही, यामुळे चर्चा पुढे होऊ शकली नाही. मात्र, अमेरिकेच्या या दाव्यानंतर भारताने यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ वाढवण्याचे मोठे संकेत दिले आहेत. लुटनिक यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले की, मी तुम्हाला भारताबद्दल सांगतो. तुम्हाला आठवत असेल तर सांगतो की, सर्वात अगोदर यूकेसोबत व्यापार करार झाले. डोनाल्ड ट्रम्प हे सीढीसारखे व्यापार करार करतात.

पहिल्या रांगेतील सर्वात अगोदर हे त्यांचे धोरण आहे. आम्ही भारताला म्हटले की, तुमच्याकडे तीन शुक्रवार आहेत. तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संवाद घडवून आणावा लागेल. मात्र, नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला नाही आणि तीन शुक्रवारी निघून गेले. आता आम्ही इंडोनेशिया, वियतनाम आणि फिलीपींस या देशासोबत करार करत आहोत.

पुढे त्यांनी म्हटले की, मोठ्या करारकरिता भारताने फोन करून आम्हाला सांगितले की, आम्ही तयार आहोत. त्यांना मी म्हटले की, कशासाठी तयार आहात? आम्ही तुम्हाला तीन आठवड्यांचा वेळ दिला होता. तुम्ही ज्या रेल्वेची वाट स्टेशनवर बघत आहात ती पुढे गेली. आता त्यांनी स्पष्ट केले की, भारताला अगोदर मिळणारा करार आता मिळणार नाहीये. भारत आणि आम्ही या कराराकरिता तयार नक्कीच होतो. मात्र, भारत पूर्णपणे तयार नव्हता. अगोदर जे करार झाले आता ते नसतील. व्यापार करार होऊ शकले नसल्यानेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला 500 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिल्याचे सांगितले जाते.

सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल.
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्....
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा.
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल.
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास.
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात.
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं.
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?.
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला.