डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत मोठी घोषणा, थेट म्हणाले, आम्ही युद्धात…

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. यादरम्यान मोठ्या विनाशाला सुरूवात झाली. परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. अमेरिकेने युद्धातून माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेटपणे उत्तर दिले.

डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत मोठी घोषणा, थेट म्हणाले, आम्ही युद्धात...
US President Donald Trump
| Updated on: Apr 04, 2026 | 8:11 AM

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. सतत मोठे हल्ले केले जात आहेत. युद्धाला एक महिना पूर्ण झाला, तरीही युद्ध काही थांबत नाही. यादरम्यानच अमेरिकेच्या हवाई दलातील लढाऊ विमाने पाडली जात आहेत. अमेरिका कोणत्याही क्षणी युद्धातून माघार घेऊ शकते, असे सांगितले जात आहे. हेच नाही तर अमेरिकेने युद्धातून माघार घेतल्याचेही सांगितले गेले. यावर आता थेट डोनाल्ड ट्रम्प यांनीच मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, अरे आ्म्ही युद्धात आहोत.. आम्ही कोणत्याही प्रकारची माघार घेतली नाही. अमेरिकेच्या हवाई दलातील महत्वाचे विमान अपघातग्रस्त होत असताना एक मुलाखत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अपघातग्रस्त विमानांमध्ये माहिती देण्यास नकार दिला.

सध्याच्या परिस्थितीवर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, सध्या परिस्थिती कठीण आणि संवेदनशील आहे. मी तुम्हाला रेस्क्यू ऑपरेशनबद्दल फार काही माहिती देऊ शकत नाही. या घटनांमुळे युद्धावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही युद्धात आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदरच इराणवर घातक हल्ले सुरू करणार असल्याचे म्हटले होते. आता इराणवरील हल्ले वाढली आहेत.

Loading...

इराण आणि अमेरिका युद्ध पेटताना दिसत आहे. इराणही युद्धाला घातक पणे उत्तर देत आहे. अमेरिकेच्या लष्कर दलातील महत्वाचे लढाऊ विमान होर्मुज खाडीत पडल्याने खळबळ उडाली. पायलट सुरक्षित आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच लवकरात लवकर युद्ध थांबवण्याबद्दल मोठे विधान केले होते.

त्यामध्येच आता त्यांनी माघार घेतल्याची चर्चा असताना आम्ही युद्धात आहोत, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. काही तासांमध्ये युद्धबंदीची घोषणा होण्याची शक्यता आहे. इराणमध्ये खराब शासन आणि पण बॉम्ब हल्ले हा पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे. इस्त्रायल आणि इराण मिळून इराणवर कारवाई करत आहे. होर्नुज मार्ग अजूनही इराणकडून बंद ठेवण्यात आला. होर्मुज मार्ग बंद असल्याने अनेक देशात एसपीजी गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी टंचाई निर्माण झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us