AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुज खाडीत हाहाकार! अमेरिकेला सर्वात मोठा दणका, थेट अमेरिकन हवाई दलाचे..

अमेरिका आणि इराण युद्धाला एक महिना झाला. मात्र, तरीही युद्ध काही थांबत नाही. उलट युद्ध अधिक भडकल्याचे बघायला मिळत आहे. यादरम्यानच आता युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला. ज्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारही केला नाही असे काही घडले आहे.

होर्मुज खाडीत हाहाकार! अमेरिकेला सर्वात मोठा दणका, थेट अमेरिकन हवाई दलाचे..
US Air Force fighter jet crashes
| Updated on: Apr 04, 2026 | 7:44 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. इराणवरील हल्ले इस्त्रायल आणि अमेरिकेने अधिक घातक केली. मात्र, तरीही इराण हार मानत नाही. यादरम्यानच या युद्धात अमेरिकेच्या हवाई दलाला अत्यंत मोठा झटका बसला. अमेरिकेच्या हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अमेरिकेच्या द न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, फारसी खाडीमध्ये अमेरिकेच्या हवाई दलातील लढाऊ विमानाचा मोठा अपघात झाला. या विमानातील पायलट सुरक्षित असल्याची माहिती आहे. पण विमानाचे मोठे नुकसान झाले असून काहीच राहिले नाही. अपघातग्रस्त विमान फेअरचाइल्ड रिपब्लिक A-10 थंडरबोल्ट II होते. जे अमेरिकेच्या हवाई दलातील अत्यंत अत्याधुनिक विमान आहे. हे विमान होर्मुज खाडीच्या अगदी जवळ कोसळले. इराणच्या मीडियाच्या दाव्यानुसार, त्यांच्या एअर सिस्टमने या विमानाचा टार्गेट बनवले होते.

त्यापूर्वीच F-15E लढाऊ विमानाला पाडण्यात आले आणि त्यानंतर या विमानाचा अपघात झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने असा दावा करत आहेत की, त्यांनी इराणचे सर्व हवाई दल नष्ट केले आहे, पण तरीही अमेरिकेच्या विमानांचे मोठे नुकसान होतांना दिसत आहे. अमेरिकेच्या लढाऊ विमानांना टार्गेट करत मोठे हल्ले केले जात आहेत.

यादरम्यान बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, आम्ही युद्धात आहोत. मात्र, या युद्धात अमेरिकेच्या लष्कराला मोठे दणके बसताना दिसत आहेत. यादरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अमेरिकेच्या हवाई दलाचे मोठे नुकसान युद्धात होताना दिसत आहे. यादरम्यान अमेरिका युद्धातून माघार येणार अशी चर्चा आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, या घटनांचा युद्धावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही युद्धात आहोत… आम्ही युद्धात आहोत. हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दोनदा सांगण्यात आले. होर्मुज खाडी सुरक्षित करण्यात अजूनही अमेरिकेला यश मिळाले नाही. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात आपला मोर्चा इराणच्या मोठ्या पुलांकडे वळवला आहे. इराणी पुलांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत.

Follow Us