इराणवर पुन्हा हल्ला? 10000 सैनिक मध्य-पूर्वेकडे रवाना, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?

US vs Iran : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता असताना आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा युद्धाची तयारी सुरु केल्याचे दिसत आहे.

इराणवर पुन्हा हल्ला? 10000 सैनिक मध्य-पूर्वेकडे रवाना, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?
Trump War DJ
Image Credit source: Google
| Updated on: Apr 15, 2026 | 10:52 PM

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम झाला आहे, मात्र हे युद्ध अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. दोन्ही देशांमध्ये आगामी काळात चर्चा होऊन करार होऊ शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हे युद्ध संपवण्याच्या बाजूने असल्याची माहिती समोर आली होती, मात्र आता अमेरिकेने मध्यपूर्वेत लष्करी उपस्थिती वाढवून परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली आहे. अमेरिकन प्रशासनाने मध्यपूर्वेत सुमारे 10000 अतिरिक्त सैनिक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय आहे हे समजण्या पलिकडील आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, मध्य पूर्वेत पाठवल्या जाणाऱ्या 10 हजार सैनिकांपैकी सुमारे 6000 जवान USS जॉर्ज H.W. बुश या युद्धनौकेद्वारे तैनात करण्यात आले आहेत, तर उर्वरित 4200 जवान बॉक्सर एम्फिबियस रेडी ग्रुप आणि 11 व्या मरीन एक्सपेडिशनरी युनिटसोबत पोहोचणार आहेत. याशिवाय, खाडी प्रदेशात आधीपासून तैनात असलेल्या सुमारे 50000 अमेरिकन सैनिकांसोबत या नव्या तुकड्यांची भर घालून लष्करी ताकद आणखी वाढवली जात आहे.

एअरक्राफ्ट कॅरियर्सची तैनाती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य पूर्वेत अमेरिकेने आपली नौदल शक्तीही वाढवली आहे. युएसएस अब्राहम लिंकन, युएसएस जेराल्ड लिंकन, युएसएस जेराल्ड आर फोर्ड आणि युएसएस जॉर्ज HW बुश हे तीन मोठे एअरक्राफ्ट कॅरियर्स खाडी परिसरात तैनात असून, कोणत्याही क्षणी कारवाईसाठी सज्ज आहेत. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. ट्रंप सतत सांगत आहेत की युद्ध लवकरच संपेल, पण ते असंही म्हणत आहेत की पुढील काही दिवसात जग काही धक्कादायक गोष्टी पाहू शकते. त्यामुळे ट्रम्प यांच्या भूमिकेवरून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.

काय संकेत मिळतात?

डोनाल्ड ट्रंप यांचा हा निर्णय स्पष्टपणे दाखवतो की, अमेरिका एका बाजूला कूटनीतिक मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला संभाव्य लष्करी संघर्षासाठी पूर्ण तयारीही ठेवत आहे. मध्यपूर्वेतील परिस्थिती अजूनही अत्यंत संवेदनशील आहे. खाडी देशांना शांतता हवी आहे, मात्र सोबतच या ठिकाणी मोठ्या संघर्षाचा धोका आहे. त्यामुळे आता आखाती देशांमध्ये काय होणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

Follow Us