
रशियाने वेनेजुएलाच्या किनाऱ्यापासून दूर अंतरावर उभ्या असलेल्या तेल टँकरला एस्कॉर्ट करण्यासाठी एक पाणबुडी आणि नौदल संपत्ती पाठवली आहे. अमेरिका-रशिया संबंधांत हा एक नवीन फ्लॅशपॉइंट बनला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. वेनेजुएलाच्या समुद्रात रशियाचा एक जुना तेल टँकर अडकला आहे. त्याच्या सुरक्षेसाठी रशियाने एक सबमरीन आणि अन्य नौदल संपत्ती पाठवली आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनुसार हा तेल टँकर अमेरिका आणि रशियामध्ये तणावाचं नवीन केंद्र बनला आहे. अमेरिकी कोस्ट गार्ड मागच्या दोन आठवड्यांपासून अटलांटिक महासागरात या जहाजाचा पाठलाग करत आहे.
एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितलं की, रशियाने एका गंजलेल्या तेल टँकरला एस्कॉर्ट करण्यासाठी एक पाणबुडी आणि अन्य नौदल संपत्ती पाठवली आहे. अमेरिका-रशिया संबंधात हा नवीन फ्लॅशपॉइंट बनला आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. बेला 1 (Bella 1) नावाचा हा टँकर वेनेजुएलामध्ये तेल लोड करण्यात अपयशी ठरला. आता टँकर रशियाच्या दिशेने जात आहे. अमेरिकेला ‘डार्क फ्लीट’ च्या माध्यमातून बेकायद तेल व्यापार रोखायचा आहे.
कुठल्याही चौकशीशिवाय या जहाजाला आपलं रजिस्ट्रेशन दिलं
डिसेंबर महिन्यात अमेरिकी कोस्ट गार्डने हे रशियन जहाज ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण चालक दलाने त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. पाठलाग सुरु केल्यानंतर या जहाजावर रशियन झेंडा लावला व नाव बदलून मॅरिनेरा केलं. एक्सपर्ट्सच म्हणणं आहे की, रशियाने कुठल्याही चौकशीशिवाय या जहाजाला आपलं रजिस्ट्रेशन दिलय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यातंर्गत या जहाजाला सुरक्षा मिळाली. या तेल टँकरचा पाठलाग बंद करा असं रशियाने अमेरिकेला सांगितलं आहे.
कारवाई करण्यासाठी आम्ही तयार
टँकरच्या स्थितीवर आम्ही नजर ठेऊन आहोत असं रशियन परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. या भागातून जाणाऱ्या कुठल्याही प्रतिबंधित जहाजाविरुद्ध कारवाई करण्यासाठी आम्ही तयार आहोत असं अमेरिकन सैन्याच्या साऊदर्न कमांडने सोशल मीडियावर म्हटलं आहे. सध्या हा टँकर बेटापासून 300 मैलावर दक्षिण उत्तर समुद्राच्या दिशेने सरकत आहे. युक्रेन युद्धावरुन आधीच अमेरिका आणि रशियामध्ये तणाव आहे. युद्ध थांबवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागणीला रशिया अजिबात किंमत देत नाहीय.