Venezuela-Pakistan : अमेरिकेची सैन्य कारवाई वेनेजुएलात, पण टेन्शनमध्ये पाकिस्तान, समजून घ्या त्यामागची तीन मोठी कारणं
Venezuela-Pakistan : अमेरिकेने शनिवारी मध्यरात्री अचानक वेनेजुएलात सैन्य कारवाई केली. अमेरिकन कमांडोजनी वेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना राहत्या घरातून अटक केली. या घटनेचे जगभरात पडसाद उमटत आहेत. आपला शेजारी पाकिस्तान या कारवाईमुळे अस्वस्थ झाला आहे. त्यांची चिंता वाढण्यामागची तीन प्रमुख कारणं आहेत.

अमेरिकेने वेनेजुएलामध्ये सैन्य कारवाई करुन राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. भले ही घटना लॅटिन अमेरिकेत घडली असेल, पण त्याचा परिणाम जगातील अन्य भागातही दिसून येतोय. वेनेजुएलाच्या घटनेमुळे पाकिस्तानात अस्वस्थतता वाढली आहे. यामागे फक्त राजकारण नाही, तर दुसरी कारणही आहेत. वेनेजुएलाच्या कारवाईमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये का आलाय? ही कारणं डिटेलमध्ये समजून घेऊया. अमेरिकेने थेट सैन्य कारवाई करुन मादुरो यांना कैद केलं.
पाकिस्तानच्या चिंतेचं पहिलं कारण
वेनेजुएलाच्या सैन्याकडे मोठ्या संख्येने चिनी शस्त्रास्त्र आणि सैन्य सिस्टिम आहे. अमेरिकेच्या कारवाई दरम्यान वेनेजुएलाला प्रभावी प्रत्युत्तर देता आलं नाही. हेच पाकिस्तानच्या शहबाज सरकारच्या चिंतेचं कारण आहे. पाकिस्तानी सैन्यदलांकडे 82 टक्के शस्त्रास्त्र चिनी बनावटीची आहेत.
दुसरं कारण
वेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना दीर्घकाळापासून जनतेचं समर्थन मिळत नव्हतं. महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक तंगीमुळे जनता सरकापासून लांब गेलेली. म्हणूनच अमेरिकेच्या कारवाईनंतर तिथे सत्ता परिवर्तन सोपं बनलं. पाकिस्तानातही कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. आर्थिक संकट, महागाई, राजकीय अस्थितरता आणि जनतेमधील वाढता असंतोष यामुळे पाकिस्तान सरकार आणि लष्कर दोघे अडचणीत येऊ शकतात.
मे 2025 मध्ये पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणालेले की, पाकिस्तानात जवळपास 2.2 कोटी लोक भीक भाग मागतात. त्यातून वर्षाला 42 अब्ज रुपयांची कमाई होते. यूनिसेफच्या रिपोर्ट्नुसार, पाकिस्तानात 1.25 कोटीपेक्षा जास्त मुलं, म्हणजे लहान मुलांच्या लोकसंख्येच्या 16 टक्के बाल मजुरी करतायत. जनता सोबत नसेल, तर बाहेरील ताकदीसमोर सिस्टिम कमजोर पडू शकते ही वेनेजुएलाप्रमाणे पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या मनात भिती आहे.
तिसरं कारण
इराण पाकिस्तानचा शेजारी देश आहे. इराण सुद्धा अमेरिकेच्या रडारवर आहे. इस्रायल आणि अमेरिकेने मिळून हल्ला केला, तर त्याचा थेट परिणाम पाकिस्तानवर होईल. पाकिस्तानची पश्चिमी सीमा आधीपासूनच संवेदनशील आहे. इराणमध्ये संकट वाढल्यास शरणार्थींची समस्या येईल. त्याचा परिणाम सीमा सुरक्षा आणि अंतर्गत असुरक्षिततेचा धोका पाकिस्तानात वाढू शकतो. म्हणून Action भले वेनेजुएलामध्ये झाली असेल, पण टेन्शनमध्ये पाकिस्तान आहे.
