AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Price Today 04 March 2026 : आता काय खरं नाही ! सोन्या-चांदीच्या किंमतीनी पुन्हा भरली धडकी, आजचे दर ऐकाल तर…

Gold-Silver Price Today 04-03-2026 Latest News Updates in Marathi : इस्त्रायल अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे फक्त त्यांचे देश नव्हे तर अख्खं जग टेन्शनमध्ये आलं आहे. या तणावाचा , संघर्षाचा परिणा सोन्या-चांदीवर देखील होत असून दोन्ही धातूंच्य किंमतीत सर्रकन वाढ झाली आहे. 4 मार्च रोजी, सकाळी सोन्याचे भाव किती, घेऊया जाणून.

Gold-Silver Price Today 04 March 2026 : आता काय खरं नाही ! सोन्या-चांदीच्या किंमतीनी पुन्हा भरली धडकी, आजचे दर ऐकाल तर...
सोनं चांदीचे दरImage Credit source: social media
| Updated on: Mar 04, 2026 | 10:49 AM
Share

Gold Rate Today : इस्त्रायल अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याने इराणने त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवलाय. सध्या जगात युद्धाचे ढग असून सगळीकडे अशांततेचं वातावरण पहायला मिळत आहे, याचाच परिणाम बाजारावरही दिसत असून सोन्या-चांदीच्या किंमतीनी थेट वरची पायरी पकडली आहे. आज सोनं आणि चांदीच्या किमती (Gold-Silver Price Today) वाढल्या. स्थानिक बाजारात सोने आणि चांदी दोन्ही मजबूत पातळीवर व्यवहार करत आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या किमती 1.1 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅमसाठी 1,63,510रुपये भाव झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलोसाठी 2,67,690 रुपये झाले आहेत. जागतिक पातळीवरच्या तेजीचे भारतीय बाजारावर स्पष्ट परिणाम होत असून सुरक्षित आश्रयस्थान म्हणून गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळत आहेत.

आजचे सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा भाव 1870 रुपयांनी वाढून 1,63, 510 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. एका ग्रॅम सोन्यासाठी 16 हजार 351 रुपये मोजावे लागतील. एका किलोग्रॅम सोन्याचा भाव 1, 63,51,000 रुपये आहे.

चांदीचे ताजे दर

चांदी 999 ची किंमत प्रति किलोग्रॅम 2,67,690 रुपये आहे. एक ग्रॅम चांदी सध्या 268 रुपयांना मिळते आहे, तर 10 ग्रॅम चांदीची किंमत 2677 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदी 26, 769 रुपये आहे. जागतिक स्तरावरील तेजीचे प्रतिबिंब चांदीच्या किमतींवर स्पष्टपणे दिसून येत आहे.

एका वर्षात किती बदलले दर ?

सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात 1.16 टक्के वाढ झाली आहे. तर आठवड्याभरात सोनं 1.21 टक्क्यांनी वाढलंय. एकाच महिन्यात सोन्याच्या किमतीत 14.22 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत तब्बल 89.47 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. चांदीने एकाच वर्षात 177.95 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातीस परिस्थिती

एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 62,960 रुपये आहे. चांदीचा भाव प्रति किलो 2,67,500 रुपये आहे. यूएस कॉमेक्स एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रति औंस 5174.90 डॉलर्स आहे, तर चांदीचा भाव प्रति औंस 84.52 डॉलर्स इतका आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...