AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Gavaskar : इंग्लंड विरुद्ध जिंकायचय तर सर्वात आधी त्याच्या हातात चेंडू दे, सेमीफायनलआधी सुनील गावस्कर यांचा महत्वाचा सल्ला

Sunil Gavaskar : टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. इंग्लंड विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. या सामन्याआधी भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी काही महत्वाचे सल्ले दिले आहेत.

Sunil Gavaskar : इंग्लंड विरुद्ध जिंकायचय तर सर्वात आधी त्याच्या हातात चेंडू दे, सेमीफायनलआधी सुनील गावस्कर यांचा महत्वाचा सल्ला
Sunil Gavaskar
| Updated on: Mar 04, 2026 | 9:51 AM
Share

भारत आणि इंग्लंडमध्ये उत्तम सेमीफायनल सामना पहायला मिळेल अशी अपेक्षा महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी20 वर्ल्ड कपचा सेमीफायनल सामना होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडच्या तुलनेत भारताची बाजू थोडी वरचढ असल्याचं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. भारतीय बॅटिंगची फळी आणि जसप्रीत बुमराह या दोन गोष्टींमुळे भारत इंग्लंडच्या तुलनेत थोडा सरस आहे, असं सुनील गावस्कर यांचं मत आहे. गावस्कर यांच्या मते जसप्रीत बुमराहची गोलंदाजी खेळणं इतकं सोपं नाही. 2022 साली ऑस्ट्रेलियात एडिलेड येथे सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 10 विकेट राखून विजय मिळवला होता. “दोन्ही टीम्स तुल्यबळ आहेत. त्यांच्याकडे चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी युनिट आहे. मधली फळी दोघांची सक्षम आहे. फिनिशर सुद्धा दोघांकडे आहेत. दोन्ही टीम्सकडे गोलंदाजीत वैविध्य आहे” असं गावस्कर सिलेक्ट मीडियाशी बोलताना म्हणाले.

इंग्लंडच्या टीममध्ये आयपीएल खेळलेले काही खेळाडू आहेत. त्यांना भारतीय वातावरणाची कल्पना आहे. बाद फेरीचा सामना खेळताना असणार्‍या दबावाची जाणीव आहे. त्यामुळे हा सामना रोमहर्षक होईल” असं गावस्कर म्हणाले. “जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडच्या फलंदाजांमधील सामना पाहणं तसच सामन्याचा निकाल ठरवण्यात हॅरि ब्रुकची भूमिका महत्वाची असेल. लवकर पावरप्लेमध्ये बुमराहला गोलंदाजीला आणावं” असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.

गावस्कर यांच्या मते त्याला लवकर गोलंदाजी का द्यावी?

“पावरप्लेमध्ये जसप्रीत बुमराहने कमीत कमी दोन ओव्हर गोलंदाजी करावी. कारण नव्या चेंडूने गोलंदाजी करताना त्याने जोस बटलर, फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रुक यांचे विकेट काढले तर इंग्लंडचं कंबरडं मोडलं जाईल” याकडे सुनील गावस्कर यांनी लक्ष वेधलं. “बुमराहला जर पाचव्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आणलं तर तो पर्यंत 20 चेंडूंमध्ये 8 ते 10 बॉल दोन्ही फलंदाज खेळलेले असतील. ते सेट झालेले असतील. त्यामुळे बुमराहला लवकर गोलंदाजीला आणून विकेट काढणं जास्त महत्वाचं आहे” असं सुनील गावस्कर यांना वाटतं.

बॅटिंग युनिटचं उदहारण देताना गावस्कर यांनी कोणाचं नाव घेतलं?

दुसऱ्याबाजूला लवचिक बॅटिंग युनिटचं उदहारण देताना गावस्कर यांनी तिलक वर्माचं उदहारणं दिलं. आयसीसी टुर्नामेंटमध्ये त्याने वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केलीय. तिलक वर्मा आधी नंबर 3 वर खेळायचा. पण टीम मॅनेजमेंटने संजू सॅमसनला वरती आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिलक 5 व्या 6 व्या नंबरवर फलंदाजीला येतो. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यात तिलकने महत्वाचं योगदान दिल्याचं गावस्कर यांनी सांगितलं.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?