Explained : युद्धात इराणची सर्वात मोठी हार, मिडिया दाखवतेय त्यापेक्षा वास्तव खूप वेगळं

Iran US Israel War Update : किरकोळ देहाचा माणूस ठामपणे उभा राहिला. बलाढ्य माणसाला नडला, तर पाहणाऱ्यांना त्याचं कौतुक वाटतं किंवा बलाढ्य माणसाने हात उचलला तर दुसऱ्या माणसाबद्दल एक सहानुभूती निर्माण होते. ही एक स्वाभाविक मानवी प्रक्रिया आहे. अमेरिका-इस्रायल युद्धाचं तसचं आहे.

Explained : युद्धात इराणची सर्वात मोठी हार, मिडिया दाखवतेय त्यापेक्षा वास्तव खूप वेगळं
Iran Missiles
Image Credit source: Getty Images
| Updated on: Apr 14, 2026 | 7:21 PM

28 फेब्रुवारीला इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरु झालं. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आपल्या बंकरमधून बाहेर पडल्याची खात्री पटली, त्याचदिवशी या युद्धाचा शंखनाद झाला. पहिल्याच दिवशी इराणचं सर्वोच्च नेतृत्व संपवून नेतृत्वाची पोकळी निर्माण करण्याची दोन्ही देशांची रणनिती होती. त्यानुसार त्यांना पहिल्याच हल्ल्यात यश आलं. पण इराण काही दिवसात पडेल हा जो त्यांचा मनसुबा होता, तो पूर्ण झाला नाही. कारण इराण अजूनही मोजैक डॉक्ट्रीनच्या युद्ध नितीवर चालत आहे. या युद्धनितीमध्ये नेतृत्व संपलं, तरी सैन्याच्या वेगवेगळ्या शाखा, स्वतंत्र विभाग यांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे इराण अजूनही अमेरिका-इस्रायल विरुद्ध उभा आहे, लढत आहे. ट्रम्प-नेतन्याहू यांनी प्रामुख्याने दोन उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन हे युद्ध सुरु केलं होतं. एक म्हणजे रेजींम चेंज सत्ता बदल आणि दुसरं इराणची अणवस्त्र, मिसाइल निर्मिती क्षमता संपवणं. अमेरिका-इस्रायलला अजूनपर्यंत अधिकृतपणे हे दोन्ही उद्देश पूर्ण करता आलेले नाहीत. हे युद्ध अजून काही दिवस असच चाललं, तर चित्र वेगळ असू शकतं. याचे...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us