
सध्या सगळ्या जगात इस्रायलची चर्चा आहे. जगातला हा एक छोटासा देश. आकारमानामध्ये इस्रायल भारतातल्या मिजोरम या राज्याएवढा आहे. इस्रायलच क्षेत्रफळ अवघं 21,937 वर्ग किलोमीटर आहे. भारताच क्षेत्रफळ यापेक्षा 150 पट जास्त आहे. भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या घरात आहे, तर इस्रायलची लोकसंख्या काही लाखांमध्ये आहे. जगाच्या पाठिवरील या छोट्याशा देशाने आज सगळ्या जगाला हैराण करुन सोडलय. मागच्या आठवड्यात इस्रायलने लेबनानमध्ये जे केलं, त्यामुळे सगळेच अवाक झाले. एकाचवेळी हजारो हिज्बुल्लाह दहशतवाद्यांच्या खिशातील पेजरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी वॉकी-टॉकीमध्ये बॉम्बस्फोट झाले. एकाचवेळी हजारो पेजरमध्ये ब्लास्ट हे कसं शक्य आहे? त्यासाठी किती प्लानिंग करावी लागली असेल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता हळूहळू त्या प्रश्नांची उत्तर मिळतायत. आजा पेजर,-वॉकी टॉकी ब्लास्टपेक्षा पण मागच्यावर्षभरापासून इस्रायल ज्या पद्धतीच युद्ध लढतोय, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इस्रायलच्या बाबतीत सध्या जगात दोन गट पडले...