माणूस किती अंश तापमान सहन करू शकतो?, एवढे तापमान झाले की निघतो घाम

जगातील कोट्यवधी लोकं जागतिक तापमान वाढीच्या समस्येशी लढत आहेत. जगातील शास्त्रज्ञ आणि हवामान विभागाचे अधिकारी चिंताग्रस्त झाले आहेत.

माणूस किती अंश तापमान सहन करू शकतो?, एवढे तापमान झाले की निघतो घाम
| Updated on: Aug 05, 2023 | 4:57 PM

जागतिक तापमान वाढ होत आहे. अख्ख जग तापमान वाढीच्या विषयावर गंभीर आहे. यातून सुटका करण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवले जात आहेत. पण, दरवर्षी तापमानात वाढ होत आहे. तापमान वाढीचे रेकॉर्ड होत आहेत. यामुळे शास्त्रत्र चिंता करत आहेत. युरोप, आशिया, उत्तर अमेरिकेत तापमान रेकॉर्ड तोडत आहे. जगातील कोट्यवधी लोकं जागतिक तापमान वाढीच्या समस्येशी लढत आहेत. जगातील शास्त्रज्ञ आणि हवामान विभागाचे अधिकारी चिंताग्रस्त झाले आहेत. या तापमान वाढीचा सामना कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. आपण उन्हाळ्यात खूप तापमान असल्याचं म्हणतो. किती तापमान मानवासाठी योग्य असते. यावर शास्त्रज्ञांचे काय म्हणणं आहे, हे आपण पाहणार आहोत.

आद्रतेचा तापमानावर परिणाम

वयस्क तसेच युवकांना दैनंदिनीत किती तापमान हवे, यावर शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. पेन स्टेटचे शास्त्रज्ञ म्हणतात, फक्त तापमानचं नव्हे, तर आद्रताही त्यावर परिणाम करते. आद्रतेचा परिणाम तापमानावर होतो.

तापमान वाढ तोडते रेकॉर्ड

आद्रता आणि तापमान हे दोन्ही घटक मानवासाठी धोकादायक ठरत आहेत. यावर शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. दरवर्षी तापमान वाढ रेकॉर्ड तोडत आहे. यामुळे शास्त्रज्ञ चिंताग्रस्त झाले आहेत. तापमान वाढीसोबत आद्रताही वाढत आहे.

एवढे तापमान असते सुरक्षित

तापमानाबाबत २०१० ला एक जर्नल प्रकाशित करण्यात आलं. त्या अध्ययनानुसार ३५ डिग्री तापमान मानवासाठी योग्य असतो. त्यापेक्षा जास्त तापमान झाल्यास गर्मी होते. शरीरातून घाम निघू लागतो. म्हणून पंख्याची किंवा कुलरची गरज पडते.

का वाढते तापमान

रस्ते सिमेंटचे होत आहेत. सिमेंट हे डेड सेल्स आहेत. त्यामुळे तापमान वाढ होते. वाहनांची संख्या वाढत आहे. या वाहनांमधून धूर निघतो. यामुळेसुद्धा तापमान वाढ होते. शिवाय वेगवेगळ्या कारणांनी वृक्षांची कत्तल केली जाते. पण, त्या प्रमाणात झाडं लावून जगवली जात नाही. त्यामुळे देशात तापमान वाढ होत आहे. जगातील बहुतेक देश हे तापमान वाढीच्या समस्येने त्रस्त आहेत.