BMC Elections: BMC निवडणुकीसाठी महायुतीची पहिली बैठक, चर्चेच्या पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपावर मंथन सुरू झाले आहे. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची पहिली बैठक पार पडली असून, शिंदे गटाने 125 जागांवर दावा केला आहे. पहिल्या फेरीत 142 पैकी भाजपला 90 तर शिंदेच्या शिवसेनेला 52 जागा मिळाल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र बैठकीतून वगळण्यात आले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका घोषित होताच महायुतीमध्ये जागावाटपाचे मंथन सुरू झाले आहे. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची पहिली बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत शिंदेच्या शिवसेनेने 125 जागांवर दावा केल्याची माहिती आहे. चर्चेच्या पहिल्या फेरीत एकूण 227 पैकी 142 जागांचे वाटप झाले आहे. यामध्ये भाजपच्या वाट्याला 90 जागा तर शिंदेच्या शिवसेनेला 52 जागा आल्याचे सूत्रांकडून समजते. भाजप मुंबईत आपला महापौर करण्याचा इराद्याने कामाला लागला आहे आणि अधिकाधिक जागा लढण्याची त्यांची रणनीती आहे. भाजप 130 ते 150 जागांसाठी आग्रही आहे, तर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाने आठ ते दहा जागांची मागणी केली आहे. उर्वरित 85 जागांवर गुरुवारी पुन्हा बैठक होणार आहे, ज्यात वॉर्डनिहाय चर्चा केली जाईल. विजयाची शक्यता हाच मुख्य निकष राहणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवाब मलिक यांच्यामुळे या जागावाटपाच्या चर्चेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र बैठक घेतली.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट

