Central Vista | सेंट्रल व्हिस्टा लवकरच जनतेसाठी खुला, काय असतील सुविधा?

| Updated on: Sep 05, 2022 | 12:32 PM

Central Vista | इंडिया गेट जवळील सेंट्रल व्हिस्टाचे काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी याचे उद्घाटन करणार आहे. 9 सप्टेंबर पासून सामान्य नागरिकांसाठी सेंट्रल व्हिस्टा खुले होणार आहे. फोटोजच्या माध्यमातून जाणून घेऊया माहिती.

Central Vista |  सेंट्रल व्हिस्टा लवकरच जनतेसाठी खुला, काय असतील सुविधा?
डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Central Vista | इंडिया गेट जवळील सेंट्रल व्हिस्टाचे (Central Vista) काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 8 सप्टेंबर रोजी याचे उद्घाटन (Inauguration on 8th September) करणार आहे. सामान्य नागरिकांसाठी सेंट्रल व्हिस्टा 9 सप्टेंबर पासून खुले होईल. यामध्ये बोटिंगपासून ते खाण्या-पिण्यापर्यंतच्या अनेक सुविधा उपलब्ध होतील. मात्र काही बंधनेही लागू होतील. सुरक्षेच्या कारणास्तव या भागात कडक बंदोबस्त असेल. हा परिसर हायटेक कॅमेऱ्यांच्या नजरेत असेल.  याविषयीची माहिती जाणून घेऊया.

101 एकरमध्ये पसरलेले लॉन, 74 ऐतिहासिक खांब आणि 16.5 किलोमीटरचा पदपथ

मेकओव्हरनंतर सेंट्रल व्हिस्टाचे रूप बरेच बदललेले दिसत आहे. येथे 74 ऐतिहासिक खांब उभारण्यात आले आहेत. राजपथापासून ते कालवा आणि पार्किंगपर्यंत 900 हून अधिक दिवे लावण्यात आले आहेत. 101 एकरमध्ये पसरलेले लॉन आणि रोपांच्या सजावटीमुळे आणखी सुंदर दिसत आहे. इथे चालण्यासाठी 16.5 किलोमीटर लांब पदपथही आहे.

1100 कार आणि 35 बससाठी पार्किंग उपलब्ध

इथले पार्किंगही अतिशय भव्य असून त्यामध्ये 1117 गाड्या आणि 35 बसेस पार्क करता येऊ शकतात. पाण्याचा कालवा या भागाची सुंदरता आणखी वाढवेल. त्यावर 16 ब्रिज बनवण्याच आले आहे.

हे सुद्धा वाचा

मोठी आसन व्यवस्था

सेंट्रल व्हिस्टाला भेट देणाऱ्या हजारो पर्यंटकांच्या सुविधेसाठी येथे 400 अधिक बेंचेस बसवण्यात आले असून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावता यावी यासाठी 150 डस्टबिन्सही ठेवण्यात आले आहेत.

300 कॅमेऱ्यांमधून होणार लाइव्ह मॉनिटरिंग

सेंट्रल व्हिस्टा येथे 300 CCTV कॅमेरे लावण्यात आले असून लाइव्ह मॉनिटरिंगद्वारे त्यांची नजर प्रत्येक काना-कोपऱ्यावर असेल. सुरक्षेच्या कारणास्तवर प्रत्येक शिफ्टमध्ये 50 गार्ड्स हजर राहणार आहेत.

स्वच्छतेच्या सुविधा

8 ॲमेनिटि ब्लॉक्समध्ये टॉयलेट्सपासून पिण्याच्या पाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची व्यवस्था उपलब्ध असेल. तसेच टॉयलेटच्या इंटिरिअरमध्ये स्टोनच्या जाळीचा वापर करण्यात आला आहे.

16 नवी झाडे

या प्रोजेक्टअंतर्गत 16 नवी झाडे लावण्यात आली असून जुन्या झाडांचेही संवर्धन करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या राज्यांचे फूड-स्टॉल्सही लागणार

येथे फूड-स्टॉल्सही लावण्यात येणार असून तेथे पर्यटक वेगवेगळ्या राज्यातील पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. इथे दोन भागांत बोटिंगची सुविधा असेल. कृषि भवन आणि नव्याने बनलेल्या वाणिज्य भवनाच्या मागील भागात बोटिंगची सुविधा उपलब्ध असेल.

बंधने काय

इथे लोक पिकनिकसाठी येऊ शकत नाही. पर्यटक सेंट्रल व्हिस्टाचे सौंदर्य पाहू शकतात. सुविधांचा आनंद घेऊ शकतात. ही जागा स्वच्छ ठेवण्याचे आवाहन लोकांना केले जाईल.