August born babies: ‘या ‘ 5 वैशिष्ट्यांसह जन्माला येतात ऑगस्ट महिन्यातील मुलं, तुमच्या मुलांमध्येही आहेत का हे गुण ?

जी मुलं ऑगस्ट महिन्यात जन्माला येतात, त्यांच्यामध्ये काही अशी वैशिष्ट्ये असतात, ज्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी ठरतात. तुमच्या घरातील मुलांचा जन्मही ऑगस्ट महिन्यात झाला असेल तर हे जरुर वाचा.

August born babies: 'या ' 5 वैशिष्ट्यांसह जन्माला येतात ऑगस्ट महिन्यातील मुलं, तुमच्या मुलांमध्येही आहेत का हे गुण ?
Baby Boy
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 4:06 PM

मुंबई : लहान मुलं (small babies) सर्वांनाच आवडतात, आणि त्यांच्या खोडकर , मजेदार गमतीजमती सर्वांनाच हसवतात. ज्या दिवशी आपल्या मुलाचा अथवा मुलीचा जन्म होतो, तो दिवस प्रत्येक आई-वडिलांसाठी (parents) अतिशय खास असतो. आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. आपलं मूल मोठेपणी कोण होईल, कसं वागेल, असे प्रश्न सर्वच पालकांना पडतात. तुमचं मूल कोणत्या महिन्यात जन्माला आलं आहे, यावर त्याचं वागणं, बोलणं, त्याचं भविष्य अवलंबून असतं. हे संशोधनातून समोर आलं आहे. सध्या ऑगस्ट महिना सुरू आहे आणि ऑगस्ट महिन्यात जन्माला आलेली मुलं इतरांपेक्षा वेगळी असतात. त्यांच्यात काही वैशिष्ट्य (Qualities of August Born Babies) असतात, ज्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी ठरतात. तुमच्या घरातील मुलांचा जन्मही ऑगस्ट महिन्यात झाला असेल तर त्यांच्यात काय वैशिष्ट्यं असतात जाणून घ्या.

ऑगस्ट महिन्यातील मुलं असतात प्रॅक्टिकल

जी मुलं ऑगस्ट महिन्यात जन्माला येतात ते विचारांपेक्षा कृती करण्यावर जास्त विश्वास ठेवतात. ही मुलं मोठी होऊन प्रॅक्टिकल विचार करतात आणि त्यांना फॅंटसीत रमायला आवडत नाही. ते चांगले इन्फ्लुएन्सर असतात, म्हणजेच त्यांची लोकांवर पटकन, चांगली छाप पडते. आयुष्यात नेहमी भावनात्मक होण्यापेक्षा ते जीवनाकडे प्रॅक्टिकली बघतात आणि तसेच जीवन जगतात.

नेतृत्वगुण चांगले असतात

लोकांच्या समूहाचे नेतृत्व करणे, हे प्रत्येकालाच जमते असं नाही. एखाद्या व्यक्तीकडे जन्मापासूनच नेतृत्व गुण असतात. ऑगस्ट महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये चांगले नेतृत्वगुण असतात. ते स्वत:सोबतच इतरांनाही योग्य मार्ग दाखवण्याचे काम करतात.

एकटं राहणं आवडतं

वरती नमूद केल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात जन्माला येणारी मुलं प्रॅक्टिकल विचारसरणीची असतात. त्यांचे विचार जगापेक्षा वेगळे असतात. त्यांना एकटं रहायला आवडतं. मात्र त्यामुळे कधीकधी नात्यांमध्ये कटुता येऊ शकते. अशी मुलं स्वत:च्या मनातील गोष्टी इतरांसोबत फार कमी वेळा शेअर करतात.

उच्च विचारसरणी आणि अपेक्षा असतात

ऑगस्ट महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अपेक्षा थोड्या उच्च असतात आणि त्यामुळेच ते कोणतीही व्यक्ती वा एखादी गोष्ट पाहून लगेच प्रभावित होत नाहीत. ते स्वत:साठी एक स्टॅंडर्ड सेट करतात, आणि त्यापेक्षा खाली उतरणे त्यांना बिलकूल आवडत नाही. उच्च विचारसरणी आणि अपेक्षा असणे चांगले असते, मात्र बऱ्याच वेळेस त्यामुळे इतरांच्या भावना दुखावू शकतात.

सकारात्मकता पसरवतात

ऑगस्ट महिन्यात जन्माला आलेली मुलं लहानपणापासूनच सकारात्मकता पसरवतात. मोठेपणी ते एवढे सक्षम असतात, की सहजपणे लोकांच्या मोठ-मोठ्या अडचणी सोडवू शकतात. ते एक चांगले मोटिव्हेटर असतात व त्यांचे हे गुण सर्वजण वाखाणतात.

Non Stop LIVE Update
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.