नवरा भांडला म्हणून मध्यरात्री बाहेर पडली… रात्रभर तिच्या आक्रोशाने वारली हाट हादरलं… काय घडलं त्या दालनात ?
पालघरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेवर वारली हाटमधील वाचमनने बलात्कार केल्याची घटना समोर आली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा वॉचमन तिच्या नात्यातीलच असल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी मनोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.

संसारात काहीना काही कुरबुरी होत असतात. त्यातून वाद होतात. कडाक्याचं भांडणं होतं. कधी कधी तर मारहाणही होते. पण संसार चालवायचा असेल तर दोघांनीही सबुरीने घेतलं पाहिजे. दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. पण बऱ्याचदा असं होत नाही. नवराही समजून घेत नाही आणि बायकोही समजूतदारपणा दाखवत नाही. त्यामुळे जे नको व्हायला तेच होतं. पालघरमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार झाला. नवऱ्याशी भांडण झाल्यानंतर तो मारहाण करेन या भीतीने ती घराबाहेर पडली. अन् आयुष्यच उद्ध्वस्त झालं. रात्रभर तिचा आक्रोश कला हाटमध्ये चिरत गेला. पण कुणाला जाग आली नाही. या घटनेनं संपूर्ण पालघर जिल्हा (Crime News) हादरून गेला आहे.
पालघर पोलीस ठाण्याच्या मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगावमध्ये ही घटना घडली आहे. नवरा बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यामुळे तिला वाटलं आता आपला नवरा आपल्याला मारहाण करेल. नवऱ्याने मारू नये म्हणून ती रात्रीच्यावेळी घराबाहेर पडली. तिच्या घराशेजारीच वारली हाट कला दालन आहे. या ठिकाणी ती आली आणि लपून बसली. इकडे नवरा तिला शोधत होता. पण ती सुरक्षेसाठी वारली हाटमध्ये लपली. यावेळी तिच्यावर वारली हाटच्या वॉचमनची नजर गेली अन् तिथेच घात झाला.
तोंड दाबून…
वारली हाटच्या वॉचमनने तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केला. यावेळी तिने प्रतिकार करत सुटण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यापुढे तिचं काहीच चाललं नाही. तिने आरडाओरडा करून लोकांना जमवण्याचाही प्रयत्न केला. पण वॉचमनने तिचं तोंड दाबल्याने तिचा हा प्रयत्न केविलवाणाच ठरला. त्याने तिचे तोंड दाबून ठेवून तिच्यावर अमानुष अत्याचार केले.
आरोपी निघाला चुलत सासरा
अत्याचारानंतर हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिली. या वॉचमनच्या तावडीतून सुटताच या महिलेने लगेचच पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनीही तक्रार लिहून घेतली असून आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लैंगिक अत्याचार करणारा आरोपी हा पीडित महिलेचा चुलत सासरा असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास मनोर पोलीस करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
