Silver Price:चांदीचा बादशाह कोण? जगातील या टॉप-5 देशांकडं चांदीचे भंडार,भारताचा नंबर कितवा?
Most Silver Reserves On Earth: जगातील हे देश चांदीच्या स्पर्धेत अव्वल आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या टॉप-5 यादीत भारत कोणत्या क्रमांकावर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? जगातील या देशात चांदीचं भंडार आहे.

Silver Reserves: 2025 सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना तगडा झटका बसला. तर चांदीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. चांदीच्या किंमती रॉकेटसारख्या वाढल्या. चांदीने दरवाढीचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले आणि गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. चांदीच्या किंमती आकाशाला गवसणी घालत आहेत. आज एक किलो चांदीचा भाव 2,19,000 रुपयांच्या घरात आहे. पण जगातील कोणत्या देशांकडे सर्वाधिक चांदी आहे हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबतीत कोणत्या देशाचा सर्वाधिक दबदबा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? भारत या या टॉप-5 यादीत कोणत्या क्रमांकावर आहे? चला जाणून घेऊयात…
जगातील सिल्व्हर किंग
जगातील सर्वाधिक चांदीचे भंडार हे पेरू या देशाकडे आहे. जवळपास 1,40,000 मॅट्रिक टन चांदीचा साठा या देशाकडे आहे. हुआरी क्षेत्रातील ‘एंटामिना खाण’ ही जगातील नंबर एकची खाण आहे. या खाणीमुळे पेरूचा चांदीच्या बाजारात दबदबा आहे. या खाणीमुळे पेरुला चांदीच बादशाह म्हटले जाते.
रशियात चांदीचा मोठा साठा
चांदीचे भंडार असलेल्या देशात दुसर्या क्रमांकावर अर्थातच रशिया हा देश आहे. या देशाकडे जवळपास 92,000 टन चांदीचा साठा आहे. सायबेरिया आणि युराल क्षेत्रातील खाणीत मोठ्या प्रमाणात चांदीचे उत्पादन होते. राजकीय आणि आर्थिक आव्हानं असतानाही रशिया चांदीच्या जागतिक बाजारात मोलाचे योगदान देते. त्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.
चीन- उत्पादनाचा उच्चांक
तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे. या देशात जवळपास 70,000 मॅट्रिक टन चांदीचे उत्पादन होते. हेनान प्रांताच्या यिंग खाण ही चीनला चांदी मिळवून देत आहे. दरवर्षी चीनमधून चांदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. गेल्या काही वर्षात रेअर अर्थपासून ते सोने-चांदी, जस्त उत्पादनात चीन आक्रमकपणे पुढे आला आहे. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.
पोलँड-युरोपमधील सर्वात मोठा खेळाडू
चौथ्या क्रमांकावर पोलँड हा देश आहे. या देशात जवळपास 61,000 टन चांदी उत्पादन होते. सरकारी कंपनी KGHM पोलँडमधील चांदी आणि तांब्याच्या उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी आहे. 2024 मध्ये ग्लोगोव कॉपर स्मेल्टरमध्ये चांदी शुद्ध करण्यात आली.
मॅक्सिको- चांदीचा मोठा उत्पादक देश
पोलंड नंतर चांदी उत्पादनात मॅक्सिको देशाचा पाचवा क्रमांक लागतो. या देशात जवळपास 37,000 टन चांदीचे भंडार आहे. जकाटेकास मध्ये ‘न्यूमोंट की पेनास्किटो खाण’ही मॅक्सिकोतील दुसरी सर्वात मोठी आणि जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी खाण आहे. चांदी उत्पादनात मॅक्सिकोचा मोठा हातभार लागतो.
भारताचा क्रमांक कितवा?
भारत चांदीच्या उत्पादनात टॉप-5 मध्ये नाही आणि या यादीत उत्पादनात भारताचा क्रमांक लागत नाही. भारत एक मोठा ग्राहक आहे. देशात मोठ्या प्रमाणात चांदी आयात होते. तर शुद्ध चांदी निर्यात सुद्धा होते. भारतातील चांदीचे भंडार मर्यादित आहेत. पण भारत जागतिक बाजारात महत्त्वाची भूमिका निभावत आहे.
