घरात देवी लक्ष्मीचा वास आणि सुख-समृद्धी हवी? मग दिवाळीपूर्वी घराबाहेर काढा ‘या’ अशुभ वस्तू
Diwali 2026: दिवाळीत देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ करणे अत्यंत शुभ मानले जाते. काही गोष्टींमुळे घरात नकारात्मकता आणि वास्तूदोष वाढू शकतात, असे म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या आहेत.

दिवाळीचा सण आनंद, प्रकाश आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मी दिवाळीच्या रात्री प्रत्येक घरी येते आणि आपल्या भक्तांना आनंद, समृद्धी आणि कल्याणाचा आशीर्वाद देते. म्हणूनच लोक सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी आणि देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी दिवाळीपूर्वी आपली घरे स्वच्छ करतात.
जर तुम्हालाही दिवाळीत देवी लक्ष्मीने तुमच्या घरी येऊन तिचा आशीर्वाद द्यावा असे वाटत असेल, तर सणापूर्वी घरातील काही महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या. वास्तुशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार, घरात ठेवलेल्या काही वस्तू अशुभ मानल्या जातात. त्यामुळे, दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी या वस्तू घरातून काढून टाकल्या पाहिजे.
तुटलेल्या किंवा भग्न मूर्तीः देवघरात किंवा घराच्या कोणत्याही भागात ठेवलेल्या देवतांच्या तुटलेल्या किंवा भग्न मूर्ती आणि फाटलेली चित्रे अशुभ मानली जातात. त्यांचे पवित्र नदीत विसर्जन करावे किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावे.
बंद पडलेली किंवा तुटलेली घड्याळं: घरात बंद पडलेले, तुटलेले किंवा खराब झालेले घड्याळ ठेवणे हे प्रगतीतील अडथळा आणि दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते. ती दुरुस्त करून घ्या किंवा घरातून काढून टाका.
फुटलेल्या काचेच्या वस्तू आणि भांडी: घरात तडकलेली किंवा फुटलेली भांडी, क्रॉकरी आणि फुटलेले आरसे ठेवू नयेत. यामुळे वास्तू दोष आणि आर्थिक अडचणी वाढतात.
जुने आणि फाटलेले कपडे: वापरात नसलेले जुने किंवा फाटलेले कपडे दान करावेत किंवा फेकून द्यावेत. कारण ते नकारात्मक ऊर्जा वाढवतात.
जुने आणि फाटलेले बूट- चपला: जे बूट आणि चपला तुम्ही आता वापरत नाही किंवा जे पूर्णपणे फाटले आहेत, ते घरातून काढून टाका.
जुनी वर्तमानपत्रे आणि भंगार: घरात साठलेली जुनी वर्तमानपत्रे, कचरा, मासिके आणि निरुपयोगी कागदपत्रे भंगारात किंवा रद्दीत द्यावी.
एक्सापयरी वस्तू आणि औषधे: किचनमधील एक्सपायरी मसाले, जुने खाद्यपदार्थ आणि औषधांच्या बॉक्समधील एक्सापरी औषधे आणि जुने कॉस्मेटिक्स फेकून द्या.
खराब झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि तारा: घरातून तुटलेली विद्युत उपकरणे, खराब चार्जर किंवा गुंता झालेले टाकाऊ तारा (ई-कचरा) काढून टाका.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)