होमलोन घेऊन नुसतं EMI भरत बसू नका, बँकेकडून ही कागदपत्र न चुकता घ्या

गृहकर्ज घेतल्यानंतर आपण अनेक कागदपत्र बँकेकडे जमा करत असतो. ही महत्त्वाची कागदपत्र असतात. पण गृहकर्ज पूर्ण भरुन झाल्यानंतर तुम्हाला तुमची ही कागदपत्र तर परत घ्यायचीच आहे पण आणखी काही कागदपत्र देखील तुम्हाला बँकेकडून न विसरता मागायची आहेत. कोणती आहेत ती कागदपत्र जाणून घ्या.

होमलोन घेऊन नुसतं EMI भरत बसू नका, बँकेकडून ही कागदपत्र न चुकता घ्या
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 8:07 PM

Home loan : कर्ज घेतल्याशिवाय सर्वसामान्यांचे कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीत. घरच नाही तर कोणत्याही महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी देखील सर्वसामान्य लोकं कर्ज घेतात. हे कर्ज सरकारी आणि खाजगी बँका देतात. यामुळे लोकं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करु शकतात. याशिवाय इतर महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी देखील कर्ज घेतले जाते. कर्ज घेतल्यानंतर आपल्याला त्याची परतफेड करण्यासाठी ईएमआयचा पर्याय असतो. पण अनेकदा कर्ज फेडल्यानंतर ही लोकं महत्त्वाची कामे करण्याचंच विसरुन जातात. काय आहेत त्या गोष्टी जाणून घ्या.

मूळ कागदपत्रे घ्यायला विसरू नका

तुम्ही गृहकर्ज घेतले असेल आणि कर्ज पूर्णपणे परतफेड केले असेल तर तुम्हाला तुमच्या घराचे कागदपत्र बँकेकडून परत घ्यायची आहेत. ही कागदपत्र बँकेकडे जमा असतात. कर्ज घेताना ती बँकेत जमा करावी लागतात.

कागदपत्रे बँकेकडे किती दिवस राहतात

जोपर्यंत तुम्ही कर्जाची पूर्णपणे परतफेड करत नाही तोपर्यंत कागदपत्रे ही बँकेकडेच राहतात. त्यामुळे कर्जाची परतफेड केल्यानंतर तुमच्या घराची कागदपत्रे बँकेकडून मागून घ्या. वाटप पत्र, ताबा पत्र आणि विक्री करार यासारख्या कागदपत्रांचा या समावेश असू शकतो.

कोणतेही देय नाही प्रमाणपत्र

कर्ज परतफेड झाल्यानंतर तुम्ही बँकेकडून थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र जरुर घ्यावे. हे प्रमाणपत्र घेणे खूप महत्त्वाचे आहे. हा पुरावा आहे की तुम्ही कर्जाची पूर्णपणे परतफेड केली आहे. त्यामुळे बँकेचे काही देणे बाकी नाही याचा हा पुरावा असतो.

क्रेडिट प्रोफाइल अपडेट करा

कर्ज बंद झाल्यानंतर तुम्ही तुमची क्रेडिट प्रोफाइल अपडेट केली पाहिजे. यामुळे भविष्यात तुम्हाला पुन्हा कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. तुमचा क्रेडिट स्कोअर कर्ज परतफेड झाल्यानंतर तपासत राहा.

भार नसलेले प्रमाणपत्र

कर्जाची परतफेड करुन झाली की, तुम्हाला भार नसलेले प्रमाणपत्र दिले जाते. हा देखील एक कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्यामध्ये परतफेडीचे सर्व तपशील दिलेले असतात. तुमच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे कर्ज थकीत नसल्याचा हा पुरावा असतो.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.