शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती, पण… शरद पवारांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तपत्रात मुलाखत दिली आहे. २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. त्यांच्या नावाबद्दल शिवसेनेत चर्चा झाल्याची माहिती आम्हाला नंतर कळल्याचे शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तपत्रात मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी मोठा दावा करत गौप्यस्फोटही केलाय. २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. त्यांच्या नावाबद्दल शिवसेनेत चर्चा झाल्याची माहिती आम्हाला नंतर कळल्याचे शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. तसेच पक्षात काम करणाऱ्यांची संधी मिळाली नाही. ही अजित पवार यांची ओरड निरर्थक आहे. तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात कधी फरक केला नसल्याचेही शरद पवारांनी म्हटले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासंदर्भात शरद पवार यांनी मत व्यक्त केले आहे. प्रफुल्ल पटेल २००४ पासून भाजपकडे जाण्याचा आग्रह करत होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

