
हिंगाचा उग्र वास धान्यांमध्ये असलेले कीटक आणि बुरशीला धान्यापासून दूर ठेवतो. आपण ते आपल्या कंटेनरमध्ये ठेवू शकता. यातून कोणतेही नुकसान होणार नाही. फक्त हिंग कापडात बांधायचे आहे. त्यामुळे हिंगाचा वास धान्यामध्ये जाणार नाही.

ग्रामीण भागात अजूनही धान्यांच्या साठ्यात कडूनिंबाची पाने ठेवली जातात. या जुन्या पद्धतीमुळे कीटक धान्याच्या जवळपास येत नाही. कोरडी कडूनिंबाची पाने एका कापडात बांधून घ्या. त्यानंतर हे कापड धान्याच्या डब्यात ठेवा.

लवंगचा किंवा लवंगचा तेलाचा वापर करुन धान्य कीटकांपासून सुरक्षित ठेवता येते. यासाठी डब्यांमध्ये लवंग ठेवा. लवंगचा उग्र वासामुळे कीटक धान्याजवळ येत नाही. तसेच मुंग्याही येणार नाहीत.

लसूण हा पदार्थ चवीसाठी फोडणीत वापरला जातो. त्याचा वास खूप तीव्र असतो. धान्याच्या डब्यात लसूण ठेवल्यास कीटक येत नाही. फक्त लसणाच्या काही पाकळ्या कापडात बांधून ठेवा.

तमालपत्र हा एक मसाला आहे. त्याचा वापर चव वाढवण्यासाठी केला जातो. त्याच्या मदतीने धान्यापासून कीटकांनाही लांब ठेवता येते. धान्यामध्ये कीटक असतील तर डब्यात ताज्या तमालपत्राची काही पाने ठेवा. या उपायामुळे धान्यात किडे येणार नाहीत.