देशाची जबाबदारी, पण सुट्टी? पंतप्रधान-राष्ट्राध्यक्षही सुट्टीवर जाऊ शकतात का ? भारत अमेरिकेतील नियम काय ?

भारत आणि अमेरिकेच्या शासनप्रमुखांना मिळणाऱ्या सुट्ट्यांबद्दल कधी प्रश्न पडला आहे का ? सामान्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सुट्ट्या मिळतात की नाही ? जाणून घेऊया सविस्तर..

देशाची जबाबदारी, पण सुट्टी? पंतप्रधान-राष्ट्राध्यक्षही सुट्टीवर जाऊ शकतात का ? भारत अमेरिकेतील नियम काय ?
| Updated on: Sep 22, 2026 | 7:03 PM

जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमध्ये भारत आणि अमेरिकेचा समावेश होतो. या दोन्ही देशांच्या शासनप्रमुखांवर संपूर्ण देशाची जबाबदारी असते. भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बहुतांश वेळी कामात अतिशय व्यस्त असतात. पण एवढ्या मोठ्या देशांची जबाबदारी सांभाळणाऱ्या या प्रमुख नेत्यांना वर्षभरात किती सुट्ट्या मिळतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? सामान्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ते सुट्टीवर जाऊ शकतात का ? तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे ? चला जाणून घेऊया..

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी काय आहेत नियम ?

सांगायचं झालं तर अमेरिकेच्या संविधानात राष्ट्राध्यक्षांच्या सुट्ट्यांबाबत कोणतीही विशेष तरतूद नाही. याचाच अर्थ असा की राष्ट्राध्यक्षांसाठी सुट्ट्यांची कोणतीही निश्चित मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. तसेच सुट्टी घेण्यासाठी त्यांना कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही. मात्र असं असलं तरीही राष्ट्रपती कधीच पूर्णपणे ऑफ ड्युटी नसतात. कारण त्यांना रोज संरक्षणमंत्र्यासारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात रहावं लागतंच. देशाच्या सुरक्षेशी संबंधित जबाबदाऱ्याही कायम त्यांच्यासोबतच असतात. त्यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या वैयक्तिक कामासाठी किंवा विश्रांतीसाठी काही दिवस वेळ काढत असले तरीही त्याला सामान्यतः ‘वर्किंग व्हेकेशन’ (Working Vacation) असं म्हटलं जातं.

भारताच्या पंतप्रधानांसाठी कसे असतात नियम ?

भारताबाबत बोलायचं झालं तर आपल्या देशाच्या संविधानातही पंतप्रधानांच्या सुट्टीबाबात कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. सामान्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कॅज्युअल लीव्ह वगैरे असते, 1998 साली ती कमी करून वर्षाला 8 दिवस इतकी करण्यात आली होती. पण देशाच्या पंतप्रधानांना हे नियम लागू होत नाहीत. पंतप्रधान पद संवैधानिकदृष्ट्या अशी जबाबदारी मानले जाते, जी वर्षभर 365 दिवस सुरू असते. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्या सुट्टीचा अर्ज किंवा त्यासाठीच्या मंजुरीबाबत कोणतीही तरतूद केलेली नाही.

व्यावहारिक स्तरावर कसं चालतं कामकाज ?

भारतात असं मानलं जातं की पंतप्रधानपदाची जबाबदारी इतकी मोठी आहे की त्यांना सुट्टी घेता येत नाही. अर्थात, वैयक्तिक प्रवास किंवा विश्रांतीसाठी ते काही वेळ नक्कीच देऊ शकतात. अलीकडेच भाजप नेते अमित शाह यांनी सार्वजनिकपणे असं विधान केलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 22 वर्षांत एकही दिवस सुट्टी घेतलेली नसून ते वर्षातील 365 दवस अविरत काम करत असतात.

यावरून असं दिसून येतं की, भारताच्या पंतप्रधानांसाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे ठरावीक ‘सुट्टी व्यवस्था’ नसते. पंतप्रधान आपल्या कामाचा आणि विश्रांतीचा समतोल हा त्यांच्या स्वतःच्या प्राधान्यक्रमांनुसार आणि देशाप्रती असलेल्या जबाबदारीच्या भावनेनुसार ठरवतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us