Snake Facts: जर माकडातून मानवाची उत्क्रांती… तर सापाचा पूर्वज कोण?

Snake Facts: मानवाची उत्पत्ती ही माकडातून झाल्याचा चार्ल्स डार्विन यांचा सिद्धांत आपण वाचला असेल. त्यामुळे माकडे हे मानवाचे पूर्वज असल्याचा दावा करण्यात येतो. पण सापाचे पूर्वज कोण होते? तुम्हाला माहिती आहे का याचे उत्तर?

Snake Facts: जर माकडातून मानवाची उत्क्रांती... तर सापाचा पूर्वज कोण?
सापाचा पूर्वज कोण?
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 28, 2026 | 3:30 PM

माकडाच्या उत्क्रांतीतून मानव तयार झाला असा दावा करण्यात येतो. माकड हे मानवाचे पूर्वज मानल्या जाते. चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीवादात हा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, माकड दोन पायांवर चालू लागले. त्याचा मेंदू मोठा झाला आणि पुढे शेपूट झडले आणि मानव म्हणून तो उदयास आला. पण सापाचा पूर्वज कोण याविषयी कधी तुम्ही विचार केला का? साप डायनासोरपासून उत्क्रांत झाला का? काय आहे त्याचे शास्त्रीय कारण?

मोठ्या पालीपासून सापाची निर्मिती

शास्त्रज्ञांच्या मते, साप हे पालीपासून (Lizards) विकसीत झाले. साप आणि पाल यांच्यातील दुवा असलेल्या Squamata नावाच्या समूहाचे तो प्रतिनिधीत्व करतो. सापाचे पूर्वज हे छोटे पाय असलेल्या पालीचे पूर्वज होते. ही पाल जवळपास 150-110 दशलक्ष वर्षांपूर्वी क्रेटेशियस काळात राहत होती. यातील काही जीव हे हळूहळू बदलत गेले. त्यांचे शरीर अत्यंत सडपातळ झाले. पुढे ते बिळात घुसण्यात आणि शिकार करु लागले. सर्वात जुन्या सापाचे जीवाश्म हे Tetrapodophis amplectus सारख्या जीवातून मिळाले आहे, त्याचे पाय अगदी छोटे छोटे होते. सध्याच्या सापाचा पूर्वज हा जवळपास 110 दशलक्ष वर्षांपूर्वीचा एक छोटा रात्री दबा धरून शिकार करणारा प्राणी होता. त्याला मागील बाजूला छोटे पाय होते. हा जीव दक्षिण अमेरिकेतली गोंडावाना या मोठ्या बेटावरील घनदाट जंगलात आढळला.

डायनासोरशी काय संबंध

डायनासमोर नष्ट झाल्यावर सापांच्या शरीर रचनेत मोठा बदल झाल्याचे अभ्यासक मानतात. डायनासोर नसल्याने मोकळी जागा मिळाली. इतर प्राण्यांची संख्या वाढली. सापांनी या सस्तन प्राण्यांची शिकार सुरू केली. त्यानंतर साप पृथ्वीच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात पोहचले. तिथल्या वातावरणानुसार त्यांच्यात बदल झाला. डायनासोर हे आर्कोसॉर समूहाचे प्रतिनिधीत्व करतात. तर साप हे लॅपिडोसॉर (Lepidosaur) समूहातील आहेत. या दोघांमधील दुवा , या दोघांचा पूर्वज हा 260 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे. पण सापांचा पूर्वज हा मुख्यतः पालच असल्याचे मानले जाते. हळूहळू या पालीचे पाय गायब झाले आणि शरीर रचनेत मोठा बदल झाल्यानंतर आज सरपटणारे साप अस्तित्वात आल्याचे मानले जाते. इंडियन रॉक पायथन (Indian Rock Python) याची उत्क्रांती अशीच झाल्याचे मानले जात आहे. वृद्ध इंडियन रॉक पायथन हा 10-18 फूट लांबीचा असू शकतो. तो मानवी वस्तीच्या जवळपास असतो. तो उंदीर, पक्षी, ससा यांची शिकार करतो.

Follow Us