AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फळ अथवा भाजीपाल्याला लागला सापाचा दात… खाणाऱ्याचा मृत्यू होणार? व्हायरल दाव्याचे सत्य काय?

Snake Bite on Vegetables Result: साप हा शेतात आणि रानावनात फिरतो. फळ आणि भाज्यांना सापाचे विषारी दात लागले आणि ते माणसाने खाल्ले तर काय होईल? खाणाऱ्याचा मृत्यू होईल का? काय आहे या प्रश्नांचं उत्तर?

फळ अथवा भाजीपाल्याला लागला सापाचा दात... खाणाऱ्याचा मृत्यू होणार? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
सापाच्या विषाने भाजपीला होतो खराब?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 21, 2026 | 4:22 PM
Share

Snake Bite on Vegetables Result: साप पाहिला तरी अनेकांचा घाबरगुंडी उडते. सापाला पाहून काही जण पळ काढतात. तर काही जणांची बोबडी वळते. बिनविषारी सापाने दंश केला तरी धक्क्याने अनेकांचा मृ्त्यू ओढावतो. साप हा रानोमाळी फिरतो. तो शेतातही आढळतो. तो फळांच्या झाडावरही दिसतो. अशावेळी जर सापाने एखाद्या फळाला दंश केला. शेतातील भाजीपाल्याला सापाचा विषारी दात लागला, तर भाजीपाला, फळं विषारी होतात का? त्याने माणसाचा मृत्यू होतो का? काय आहे याविषयीचे सत्य?

सापाने दंश केल्याने भाजपील्यात उतरते विष?

जर सापाने काकडी, भोपळा वा इतर फळांना दंश केला, त्याचे दात भाजीपाला अथवा फळाला लागला तर ते विषारी होतात का? हा अन्नघटक मनुष्याच्या पोटात गेला तर त्याचा मृत्यू होतो का? तज्ज्ञांचे मते त्याचे दुष्परिणाम अत्यंत कमी असतात. त्यामागील काही कारणंही समोर आली आहेत.

1. विषाची परीक्षा: तर सापाचे विष हे Venom असते. ते Poison नसते. म्हणजे सापाचे विष तेव्हाच घातक ठरते, जेव्हा ते थेट मनुष्याच्या रक्तात मिसळते. जेव्हा साप एखाद्या फळावर विषाचा घटक सोडतो, तेव्हा त्याचा परिणाम तितका होत नाही. तज्ज्ञांच्या मते पोटातील रसायनं त्याला पचवून टाकतात. पण जर तोडात अथवा ओठांना, गळ्यात अथवा पोटात जखम असेल तर मात्र वेगळा परिणाम होऊ शकतो.

2. संपूर्ण फळ खराब होत नाही: फळ अथवा भाजीपाला हा लागलीच संपूर्णपणे खराब होत नाही. सापाचे विष जरी फळाला लागले तरी एक भाग खराब होतो अथवा त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया होते. हे विष फळाच्या आतपर्यंत पोहचत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

3. साप शक्यतो उंदीर, बेडूक, सस्तन प्राणी, पक्षी यांच्यावर प्रतिक्रिया देतो. भीतीपोटी तो हल्ला चढवतो. पण भाजीपाला, फळं यावर तो असा हल्ला करत नाही. त्यामुळे सापाचे विष फळाला लागून एखाद्याचा मृत्यू झाल्याची घटना अजून समोर आलेली नाही. भाजीपाला, फळं घरी आल्यावर ती धुतल्या जातात. भाजी शिजवल्या जाते. त्यामुळे बरेच विषारी घटक निघून जातात.

4. सापाने माणसाला दंश केला तर त्याचे विष हे मानवी शरिरात भिनते. विषाचा परिणाम हा तेव्हाच होतो, जेव्हा रक्तवाहिन्यांतून ते शरीरात भिनते. अनेक जण विषारी औषध घेऊन जीवन संपवतात. ते विष आणि सापाच्या विषात फरक आहे. फळ वा भाजीपाल्यावाटे ते विष मानवी शरीराला अपाय पोहचवू शकत नाही.

5. तज्ज्ञांच्या मते, सापाच्या विषामुळे भाजीपाल्याचा रंग, चव अथवा इतर कोणत्या घटकावर फारसा परिणाम दिसत नाही. त्यामुळे त्यावर सापाचे विष लागलेले आहे हे डोळ्यांनी दिसत नाही. साप जरी शेतातून फिरत असला तरी त्याचे विष भाजीपाल्याला लागत नाही.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ