AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Behavior: सापाचं हे वागणं बरं नव्हं! का येतो तुमच्या घराजवळ सारखा? कारण ऐकून…

Snake Behavior: साप वारंवार तुमच्या घराजवळ का येतो? एकच साप सारखा का घराजवळ फिरतो? काय आहे त्यामागील कारण? सापाचं हे वागणं बरं नव्हं असं तुम्हाला वाटतं का, तर जाणून घ्या कारण...

Snake Behavior: सापाचं हे वागणं बरं नव्हं! का येतो तुमच्या घराजवळ सारखा? कारण ऐकून...
साप वारंवार का एकाच परिसरात दिसतातImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 14, 2026 | 3:31 PM
Share

Snake Behavior: साप हे तुमच्या घराच्या आसपास सतत दिसतात का? तर यामागे कोणताही अंधविश्वास नाही. तर त्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. साप एकाच भागात का फिरतात. त्यांचे हे वागणं तुम्हाला आवडत नसलं तरी तो त्याच्या पोटासाठी पुन्हा पुन्हा जिथं खाद्य मिळतं, तिथं शिकार हुडकण्यासाठी येतो. त्यामुळेच साप एखादे घर, खळं अथवा बगीच्यात अनेकदा दिसतो. त्यामुळे हा साप डूख धरून बसलाय की काय असे वाटण्याची अथवा घाबरण्याची गरज नाही.

सापाची नॅव्हिगेशन पॉवर

सापांमध्ये एक खास नॅव्हिगेशन पॉवर असते. म्हणजे रस्ता शोधण्याची शक्ती असते. संशोधनानुसार, सापाकडे बुद्धी असते आणि मेंदूचा वापर करत तो काही घटनांची आठवण ठेवतो. काही खाणाखुणा, भक्ष्याचे स्थान, पाण्याचे ठिकाण, थंड ठिकाण, बीळ हे लक्षात ठेवतो. उन्हाळा सुरू होताच गावासह शहरातील काही भागात साप दिसण्याचे प्रमाण वाढते. लोक सापांना बगीच्यातून, घरातून बाहेर हाकलतात. दूर सोडतात. पण तो साप पुन्हा त्याच परिसरात दिसल्यावर अनेकांचे धाबे दणाणते. पण यामागे कोणतीही अंधश्रध्दा अथवा इतर भ्रम बाळगण्याची गरज नाही.

फोरमोनमुळे भक्ष्याचा माग

सापाला एखाद्या भागात सहज भक्ष्य मिळते. त्याला सहज शिकार मिळते. मग ती मिळण्यासाठी तो त्या भागात सातत्याने जातो. या जागेची त्याला आठवण आली की तो सहज त्या ठिकाणी येतो. या प्रक्रियेला फिडेलिटी (Fidelity) असे म्हटले जाते. सापाची वास घेण्याची शक्ती अद्भूत असते. तो त्याच्या जि‍भेच्या मदतीने हवा आणि जमीनीतून आसपासचे संकेत ओळखतो. जेव्हा साप कोणत्याही रस्त्याने गेला तर तो त्याचा गंध सोडतो. त्याला फोरमोन असे म्हटले जाते.

हा वास त्याला सिग्नल देतो. तो एखाद्या नकाशासारखा त्याचा वापर करतो. त्यांनी यापूर्वी सोडलेला गंध त्यांना पुन्हा त्या परिसरात येण्यासाठी सहायक ठरतो. जिथे उंदीर, बेडूक आणि छोटे प्राणी त्याला खाण्यासाठी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. तिथे साप अधिक आढळून येतात. घराजवळील कचरा, अथवा बाहेर पडलेले धान्य हे खाण्यासाठी उंदीर येतात आणि त्यांच्या मागोमाग साप येतात. जर एखाद्या ठिकाणी सतत भक्ष्य मिळत असेल तर साप तो परिसर सहजासहजी सोडत नाहीत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ