AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Facts: साप माणसाला लक्षात ठेवतो? पिच्छा करतो, घेतो बदला? नवीन संशोधनाने अनेकांना धक्का

Snake Facts Human Recognize: शास्त्रज्ञ सापांकडे स्मरणशक्ती असते का यावर संशोधन करत आहेत. या संशोधनाचा काही भाग उजेडात आला आहे. नवीन संशोधनाने अनेकांना धक्का दिला आहे. त्यामुळे साप खरंच एखाद्याचा पिच्छा पुरवतो का? काय आहे या संशोधनाचा निष्कर्ष?

Snake Facts: साप माणसाला लक्षात ठेवतो? पिच्छा करतो, घेतो बदला? नवीन संशोधनाने अनेकांना धक्का
साप खरंच गोष्टी लक्षात ठेवतो?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 12, 2026 | 3:38 PM
Share

Snake Facts Human Recognize: जगभरात सापाच्या तीन हजारांहून अधिक प्रजाती आहे. त्यातील काही साप तर अत्यंत विषारी असतात. तर काही साप बिनविषारी असतात. धोका ओळखून साप हल्ला चढवतात. भारतात कोब्रा, करैत, व्हायपर आणि सॉ-स्केल्ड व्हायपर ही साप अत्यंत जहरी मानल्या जातात. सापाच्या स्वभावावर आणि स्मरणशक्तीवर काही शास्त्रज्ञ संशोधन करत आहे. सापाकडे स्मरणशक्ती असते का? ती किती तल्लख असते. तो काय काय लक्षात ठेवू शकतो. तो माणसाचा पिच्छा धरू शकतो का, तो बदला घेऊ शकतो का? यादृष्टीने ही संशोधन करण्यात आले. काय आहे या संशोधनाचा निष्कर्ष?

संशोधनातील धक्कादायक निष्कर्ष

पबमेड (PubMed) या संशोधन पत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार, सापांची स्मरण शक्ती क्षीण असते ही आतापर्यंतची मान्यता होती. पण या संशोधनाला त्याला छेद दिला आहे. या संशोधनानुसार, सापांकडे बुद्धी असते आणि मेंदूचा वापर करत तो काही घटनांचे स्मरण ठेवतो. स्वतःच्या अस्तित्वासाठी तो काही खाणाखुणा, भक्ष्याचे स्थान, पाण्याचे ठिकाण, थंड ठिकाण, बीळ हे लक्षात ठेवतो. साप भक्ष्य, गंध, सुरक्षित ठिकाण आणि धोकादायक ठिकाणांचं विश्लेषण करून माहिती स्मृतीत जतन करतो. ती माहिती त्याला आठवते सुद्धा. या नवीन संशोधनाने जगात खळबळ उडाली आहे.

साप माणसाला ओळखतात?

साप माणसांचा चेहरा लक्षात ठेवू शकत नाही. तो मनुष्यासोबत भावनिकदृष्ट्या जोडल्या जाऊ शकत नाही. कारण त्याच्या मेंदूत नियोकॉर्टेक्स नसते. त्याआधारेच सस्तन प्राणी चेहरा ओळखतो आणि भावनिक दृष्ट्या लक्षात ठेवतो. साप आजूबाजूची परिस्थिती ओळखण्यासाठी वास आणि कंपनावर अवलंबून असतो. साप हा जीभ आणि इतर अवयवांचा वापर करून रासायनिक प्रक्रियेआधारे एक अंदाज बांधू शकतो.

तर हे रासायनिक संकेत सापाच्या डोक्यातील जेकबसन अवयवापर्यंत संदेश पाठवतात. वास अथवा इतर घटकांआधारे तो एक प्रकारे स्मरण ठेवतो. वासावरून तो व्यक्तीला लक्षात ठेवू शकतो. त्याआधारे त्याच्याशी व्यवहार करू शकतो. स्नेक केअर सेंटरमध्ये प्रत्येक दिवशी सापाची देखभाल करणाऱ्या सदस्यांची ते ओळख ठेवतात आणि शांत होतात. पण जर नवीन लोक आले तर साप सतर्क होतात. या नवीन संशोधनात साप हा सहवासातून स्मरण ठेवतो असे समोर आले आहे. अर्थात हे संशोधन इतर काही शास्त्रज्ञांनी नाकारले आहे.

Follow Us
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण