AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Facts: पुंगीवर कसा डोलतो नागोबा? कान नसताना आवाज कसा येतो ऐकू?

Snakes Dance on the bean: गारुडी आला की पुंगीच्या वाजवून तो सापांना आपल्या तालावर नाचवतो, हे आपण तर कितीदा पाहिले आहे. काहींनी हे दृश्य चित्रपटात पाहिले असेल. कान नसताना पुंगीवर कसा डोलतो नागोबा?

Snake Facts: पुंगीवर कसा डोलतो नागोबा? कान नसताना आवाज कसा येतो ऐकू?
साप डोलतो कसाImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 10, 2026 | 3:27 PM
Share

Snakes Dance on the bean: जगभरात सापाच्या विविध प्रजाती आहेत. काही साप अत्यंत विषारी तर काही साप बिनविषारी असतात. जवळपास प्रत्येक देशात साप आढळून येतो. जीवतज्ज्ञांच्या मते साप हा अत्यंत लाजाळू प्राणी आहे. पण जेव्हा साप समोर येतो तेव्हा सर्वच जण घाबरतात. सापही माणसाला घाबरतो. पण तरीही सापाच्या दंशामुळे अनेक जणांचा मृत्यू होतो. कधीतर बिनविषारी सापाने चावल्यामुळे सुद्धा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. साप चावल्याची भीती ही त्यामागील खरं कारण आहे.

भारतात सापाचे धार्मिक कारण आहे. त्याविषयी धार्मिक मान्यता, परंपरा सुद्धा आहे. नागपंचमी सारखा सणही आहे. एकीकडे सापाची पूजा होते. तर साप दिसताच हातात काठीही घेतल्या जाते. साप, नागलोक याविषयी अनेक दंतकथा भारतीयच नाही तर अनेक देशात रूढ आहे. तर नागाच्या डोक्यावरील मणी, इच्छाधारी नाग-नागीण अशा अनेक किंवदंती ही प्रसिद्ध आहेत.

साप डोलतो कसा?

असं म्हणतात की, सापाला पुंगीचा आवाज अत्यंत आवडतो. साप हा आवाज ऐकताच डोलायला लागतो. तर अनेक चित्रपटात ही पुंगी वाजवून मनुष्याचा नाग झाल्याचे तु्म्ही पाहिलेही असेल. तुम्ही सापाकडे निरखून पाहिले असेल तर सापाला कान नसल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. तरीही साप आवाज न ऐकू येताच पुंगीवर कसा नाचत असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. तर त्यामागे गारुड्याचं कौशल्य असते. तो पुंगी सारखी हलवतो. त्यामुळे साप सुद्धा त्या पुंगीनुसार डोलतो. मागे पुढे होतो आणि तो डोलत असल्याचा भास पाहाणाऱ्याला होतो.

त्या पुंगीवर तुम्ही अनेक काचेची तुकडे लावलेले पाहिले असतील. या काचेच्या तुकड्यावर जेव्हा उजेड पडतो. प्रकाश पडतो. तेव्हा ती काच चमकते. सापाची नजर अधूंक असते. काच चमकल्यानंतर साप त्यावर प्रतिक्रिया देतो आणि शरीर हलवतो. तो त्या प्रकाशाकडे वळत असतो आणि आपल्याला तो डोलत असल्याचा भास होतो. त्यामुळे पुंगीचा आवाज हा आपले लक्ष खिळवून ठेवण्यासाठी करण्यात येतो. सापाला कान नसताना तो त्या पुंगीच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देतो. आवाजावर नाही.

सापाला कान नसले तर आजूबाजूची परिस्थिती जाणून घेण्यासाठी साप त्वचेचा वापर करतो. सापाच्य त्वचेवर आघात पडतात. तरंग आदळतात. त्याआधारे तो त्याच्या जवळपासच्या परिस्थितीचा अंदाज घेतो. त्यामुळे जेव्हा त्याला भीती वाटते अथवा धोका वाटतो, तेव्हा तो फणा काढतो आणि आक्रमक होतो. तो अंगावर धावून येतो. ही त्याची प्रतिक्रिया असते.

Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह