AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra: स्वप्नात तुम्ही घर बांधत आहात याचा अर्थ काय? आहेत भविष्यातील मोठे संकेत, वास्तुशास्त्र काय सांगतं?

अनेकदा आपल्याला झोपेमध्ये वेगवेगळी स्वप्न पडत असतात, यातील काही स्वप्न ही चांगली असतात. तर काही स्वप्न ही वाईट असतात. जेव्हा आपल्याला वाईट स्वप्न पडतं तेव्हा आपण झोपेतून दचकून जागी होतो. वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जे स्वप्न पडतं, त्यातील काही स्वप्नांमागे भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे संकेत दडलेले असतात.

Vastu Shastra: स्वप्नात तुम्ही घर बांधत आहात याचा अर्थ काय? आहेत भविष्यातील मोठे संकेत, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 10, 2026 | 8:00 PM
Share

अनेकदा आपल्याला झोपेत स्वप्न पडतात. सर्व साधारणपणे आपण दिवसभर ज्या गोष्टी करतो, आपण जे पाहिलेलं असतं किंवा आपल्या मनात जे विचार सुरू असतात, त्याच गोष्टींची स्वप्न देखील आपल्याला झोपेमध्ये पडण्याची शक्यता असते. अशा स्वप्नांना फार काही अर्थ नसतो. परंतु काही स्वप्न ही खास असतात, आपल्या मनी ध्यानी नसताना देखील आपल्याला अशी स्वप्न पडतात. ही स्वप्न तुम्हाला तुमच्यासोबत भविष्यात ज्या काही गोष्टी घडू शकतात, किंवा घडण्याची शक्यता आहे, त्याचे संकेत देण्यासाठी पडतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जसं की तुमच्या स्वप्नात जर देवी देवता आले तर लवकरच तुमचा काळ बदलणार आहे, तुमचा भाग्योदय झाला आहे, असा त्या स्वप्नाचा अर्थ असतो. तसेच जर तुम्हाला स्वप्नात सर्वत्र पैसेच पैसे दिसले तर त्याचा अर्थ तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात, असा होतो. परंतु अशी देखील काही स्वप्न असतात, जी युनिक असतात. समजा एखाद्याला त्याने घर बांधलं आहे, असं स्वप्न पडतं. मग या स्वप्नाचा नेमका काय अर्थ होतो? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? वास्तुशास्त्रानुसार हे एक शुभ स्वप्न आहे, आज आपण याच स्वप्नाच्या अर्थाबाबत जाणून घेणार आहोत.

कधी कधी तुम्हाला असं स्वप्न पडतं की, तुम्ही घर बांधत आहात किंवा तुम्ही घर बांधलं आहे. तुम्ही कधी विचार केला आहे? या स्वप्नाचा अर्थ काय होऊ शकतो? वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं स्वप्न पडतं की तो व्यक्ती घर बांधत आहे, किंवा त्यांच घर बांधून पूर्ण झालं आहे. अशा व्यक्तीचा लवकरच भाग्योदय होणार आहे, याचे ते संकेत असतात. जर समजा तुमच्या मालकीचं घर नसेल तर लवकरच तुमची स्वत:च्या घराची इच्छा पूर्ण होऊ शकते, असे संकेत देखील या स्वप्नामधून मिळत असतात. तसेच घराला आर्थिक स्थिरतेचं प्रतिक म्हणून देखील पाहिलं जातं, जर तुम्हाला अशा प्रकारचं स्वप्न पडलं तर समजून जा तुमच्या आयुष्यात आता लवकरच आर्थिक स्थिरता येणार आहे, तसेच तुमचा मान-सन्मान देखील वाढू शकतो, असे संकेत देखील या स्वप्नामधून मिळतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

शुभ फळ देणारी स्वप्न – वास्तुशास्त्रानुसार अशी काही स्वप्न असतात, जी तुम्हाला काही शुभ संकेत देण्यासाठी येतात. जसं की तुमच्या स्वप्नात जर देवी देवता आले तर लवकरच तुमचा भाग्योदय होणार आहे, असे संकेत त्यामधून मिळतात. जर तुमच्या स्वप्नात गाय आणि वासरू आलं तर ते भविष्यातील तुमच्या आर्थिक प्रगतीचे संकेत असतात. स्वप्नात पांढरा घोडा दिसणं याचा अर्थ तुमच्या प्रगतीचा वेग आता वाढणार आहे, तुम्हाला प्रगतीच्या नवीन संधी मिळणार आहेत, असा त्याचा अर्थ होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा