Snake Facts: मुंगसावर का होत नाही सापाच्या विषाचा परिणाम? कारण काय?

Snake Venom Mongoose: मुंगूस आणि सापाचं वैर जगजाहीर आहे. मुंगूसाला निसर्गाने कवच कुंडलं दिली आहे. त्याच्या अंगावरील दाट केस त्याला वाचवतात. तसेच त्याच्या शरीरातील पेशींच्या रिसेप्टर्शी त्याच्यावर विषाचा परिणाम होऊ देत नाही. पण मुंगूस कधी मरत नाही, असे नाही.

Snake Facts: मुंगसावर का होत नाही सापाच्या विषाचा परिणाम? कारण काय?
मुंगसावर का होत नाही सापाच्या विषाचा परिणाम? कारण काय?
| Updated on: Oct 20, 2026 | 2:44 PM

Snake Venom Mongoose: मुंगूस आणि सापाचं हाडवैर सगळ्यांना माहिती आहे. मुंगूसाला निसर्गाने मोठे कवच दिलं आहे. त्याच्या अंगावरील दाट केस त्याला वाचवतात. मुंगूसाचे शरीर आणि मानेवर अत्यंत दाट केस असतात. यामुळे सापाचे दात खूप खोलवर घुसूत नाही. तसेच त्याच्या शरीरातील पेशींच्या रिसेप्टर्शी त्यांच्यावर विषाचा परिणाम होऊ देत नाही. त्याला विषाविरोधात नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. त्यामुळे विषाचा शरीरावर घातक परिणाम होत नाही.

मुंगूस सापाच्या विषाने का मरत नाही

Loading...

निसर्गाची प्रतिकारशक्ती

मुंगूसाच्या शरीरात सापाच्या विषाविरुद्ध लढण्याची एक खास नैसर्गिक प्रतिकारशक्ती असते. सापाच्या विषात न्युरोटॉक्सिन नावाचे विष असते. मुंगूसाच्या शरीरातील पेशींच्या रिसेप्टर्सशवर त्याचा परिणाम होत नाही. यामुळे या विषाचा त्याच्या शरीरावर घातक परिणाम होत नाही.

जाड केस आणि चपळता

मुंगुसाच्या शरीरावर अत्यंत दाट केस असतात. सापाने चुकून मुंगूसाला दंश केला, तरी मुंगूसाचे शरीर आणि मान यावर अत्यंत दाट आणि राठ केस असतात. हे केस सापाच्या दातांना आत खोलवर जाऊ देत नाहीत. त्यात मुंगूस हा अत्यंत चपळतेने त्याचे वार चुकवतो. त्याच्यावर त्वेषाने तुटून पडतो. तो त्याचा दंश चुकवण्याचा प्रयत्न करतो. यामुळे सापाचे विष शरीराच्या आत थेट पोहचत नाही. त्यातच त्याला विषाविरोधात नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते.

पण सापही ठरतो वरचढ

मुंगूस सापाला सतत झुंजवत ठरतो. त्याच्यावर वरचढ ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण याचा अर्थ असा नाही की, सापाच्या विषाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. कधी कधी नाजूक भागावर जर सापाचा दंश लागला आणि साप अत्यंत जहरी असला तर त्याचा परिणाम मुंगूसावर होतो. मुंगूस मरतो. किंग कोब्रा अथवा अत्यंत विषारी सापाचा अतिशय खोलवर दंश झाला झाला तर, मुंगूस जिवंत राहत नाही. पण अनेकदा आपल्या चपळाईने मुंगूस सापावर वरचढ ठरतो. तो अनेकदा सापाला मारतो. त्याच्या तोंडावर आणि फणावर मुंगूस हल्ला चढवतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us