Snake Fact: मृत्यूनंतरही साप करतो हल्ला? सापाच्या या प्रजातीबद्दल ऐकलंय का? धक्कादायक माहिती…
Snake Fact: साप म्हणताच अगोदर सुरक्षित जागा आपण शोधतो. काही जणांना कापरं भरतं. काही जण आरडाओरड करतात. तर काही जण धाडसानं त्याला पकडतात. सुरक्षित सोडून देतात. पण सापाबद्दल ही माहिती तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

Snake Fact: साप म्हटलं की अनेकांच्या काळजाचा थरकाप उडतो. हातपाय लटलटतात. काहींना चक्कर येते. तर काही जण लागलीच पळ काढतात. सापाविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. सापाविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. त्यातून तशा प्रतिक्रिया उमटतात. सापाचा दंश होऊ नये याची खबरदारी सगळेच घेतात. पण सापाविषयीची ही माहिती तुम्हाला थक्क करेल. साप आपल्या साथीदाराच्या मृत्यूचा बदला घेतो असा एक गैरसमज प्रचलित आहे. पण साप मेल्यानंतर बदला घेतो असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. पण मेल्यानंतरही साप दंश करू शकतो हे तुम्हाला पटेल का? पण काही ठिकाणी अशा घटना घडल्याने त्याविषयीची माहिती समोर आली आहे.
मृत्यूनंतरही सापाच्या चेतापेशी सक्रिय
कोणताही जीव मरण पावल्यानंतर त्याचे शरीर निष्प्रभ होते. त्याची हालचाल बंद होते. पण सापाच्या काही प्रजातीबाबत हा समज खोटा आहे. त्यांना हा नियम पूर्णपणे लागू होत नाही. साप एक कोल्ड ब्लडेड, समरक्त, शीतरक्त प्राणी आहे. शास्त्रज्ञांच्या मते, सापाचे शरीरी अथवा त्याचे शीर धडापासून वेगळे झाल्यानंतरही त्याचे मज्जातंत्र आणि चेतापेशी कार्यरत असतात. त्या सक्रिय असतात.
तर मग दंश झालाच म्हणून समजा
काही लोक सापाला मारतात आणि हातात पकडून तो फेकून देण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना हा मृत्यूशी खेळ असल्याचे लक्षात येत नाही. अनेकदा मेलेल्या सापाच्या डोक्याला, तोंडाला चुकून पाय, हाताचा स्पर्श झाला तर मज्जातंतूंच्या तात्काळ प्रतिक्रियेनुसार जबडा उघडल्या जातो आणि दंश होऊ शकतो. सापाचे विषारी दात लागून मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विषारी साप मेल्यानंतरही मोठा धोकादायक ठरू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, अनेकदा मारला गेलेला साप हातात पकडून फेकून देण्याची चेष्टा काही लोक करतात. काही जण शेपटी पकडतात. काही थेट डोकं धरतात. मृत सापाचे स्नायू क्षणिक हालचाल करून दंश करू शकतात. यामुळे मृत सापाला हातात पकडे हे जोखमीचे ठरू शकते. त्याचे मज्जातंतु तात्काळ प्रतिक्रिया देत असल्याने धोका वाढतो.
