AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Facts: हा साप पाहताच पक्षी का मारतात त्याला चोची? का त्याची दहशत इतकी?

Snake Facts: हा साप अनेक पक्ष्यांच्या घरट्यांसाठी अत्यंत धोकादायक मानल्या जातो. आफ्रिका आणि भारतात आढळणारा हा साप पाहताच पक्षी एकच गोंगाट करतात. काही पक्षी त्याला चोची मारतात.

Snake Facts: हा साप पाहताच पक्षी का मारतात त्याला चोची? का त्याची दहशत इतकी?
हा साप पाहताच पक्षी का मारतात त्याला चोची?
| Updated on: Oct 11, 2026 | 1:30 PM
Share

Common Egg Eater Snake: जगात सापाच्या विविध प्रजाती आहेत. काही साप विषारी तर काही बिनविषारी आहेत. या सापच्या विविध प्रजातीत असाही एक साप आहे की त्याला पाहाताच पक्षी आरडाओरड करतात. एकमेकांना संभाव्य धोक्याची सूचना देतात. हा साप अनेक पक्ष्यांच्या घरट्यांसाठी धोकादायक मानल्या जातो. आफ्रिका आणि भारतात आढळणारा हा साप पाहताच पक्षी एकच गोंगाट करतात. काही पक्षी त्याला चोची मारतात. कारण हा साप पक्षांच्या घरट्यातील अंडी गिळतो. मोठाली अंडी सुद्धा तो गिळंकृत करतो.

या सापाचा आहार अंडीच

अंडी गिळणारा साप हा आफ्रिकेच्या घनदाट जंगलात अथवा काही विशिष्ट प्रदेशांत आढळतो. तो भारतातही आढळतो. त्याला इंडियन एग इंटिंग स्नेक असे म्हणतात. या सापाचा मुख्य आहार हा केवळ पक्ष्यांची अंडी गिळणे हाच आहे. हा साप अंडी थेट गिळतो. तो त्याच्या दातांचा वापर करत नाही. त्याला विषारी दातही नसतात. विशेष म्हणजे या सापाचे तोंड आणि शरीर हे बारीक असते. पण त्याचा जबडा अत्यंत लवचिक असतो. तो स्वतःच्या तोंडापेक्षा अथवा शरीराच्या आकारापेक्षा कित्येक पटीने मोठे अंडे एकाच वेळी गिळतो.

अंडे पोटात गेल्यावर काय होते?

अंडे पोटात गेल्यानंतर या सापाच्या पोटात ते फोडण्यासाठी निसर्गाने त्याला खास वरदान दिले आहे. त्यानुसार जेव्हा अंडे त्याच्या पोटात जाते, तेव्हा तो आपल्या स्नायुंच्या आणि मणक्याच्या हाडांच्या मदतीने ते अंडे आतल्या आत फोडतो. अंडे फुटल्यानंतर त्यातील पिवळा भाग आणि पोषक घटक शोषून घेतल्या जातो. त्यानंतर अंड्याचे जे कडक टरफल असते, ते हा साप अत्यंत सफाईदारपणे तोंडातून बाहेर फेकून देतो.

पक्षी येण्यापूर्वीच अंडी गायब

सहारा वाळवंटाच्या जवळपास या सापाची प्रजाती आढळते. त्यात गवताळ प्रदेश, पानझडी जंगलांचा समावेश आहे. हा साप झाडांवर चढण्यात पटाईत आहे. पक्षी येण्यापूर्वीच तो त्यांची अंडी गिळंकृत करतो. तर कधी कधी इतर पक्षी आवाज करून धोक्याची सूचना देतात. भारतात या सापाची प्रजाती ही महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटकासह उत्तर भारतातील काही भागात आढळते. हा साप दुर्मिळ असल्याने वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्याचे रक्षण करण्यात येते. ही संरक्षित प्रजाती आहे.

Follow Us
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका