AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nvidia CEO News: आठ दिवसात Nvidea चा युटर्न, जेन्सन हुआंग यांची पुन्हा CEOपदी नियुक्ती!

अफेयरच्या वादामुळे  एनविडियाने कंपनीकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र आता अवघ्या एकाच आठवड्यात कंपनीने हा निर्णय बदलला आहे. एनविडियाचे सीईओ आणि अध्यक्ष म्हणून जेन्सन हुआंग यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. 

Nvidia CEO News: आठ दिवसात Nvidea चा युटर्न, जेन्सन हुआंग यांची पुन्हा CEOपदी नियुक्ती!
Nvideoa CEO
| Updated on: Nov 23, 2026 | 8:14 PM
Share

Nvidia CEO News: चिनी महिला गुप्तहेरासोबतच्या प्रेमप्रकरणानंतर जगातील सर्वात मोठी एआय चीप मेकिंग कंपनी असलेल्या एनविडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांना कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अफेयरच्या वादामुळे  एनविडियाने कंपनीकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र आता अवघ्या एकाच आठवड्यात कंपनीने हा निर्णय बदलला आहे. एनविडियाचे सीईओ आणि अध्यक्ष म्हणून जेन्सन हुआंग यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे.

जेन्सन हुआंग पुन्हा एनविडियाचे सीईओ! 

एनव्हिडियाने जेन्सन हुआंग यांच्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांची सीईओ आणि अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. हुआंग यांच्या पुनर्नियुक्तीबाबत एनव्हिडियाने एक निवेदनही जारी केले आहे. संचालक मंडळाचे अध्यक्ष हार्वे सी. जोन्स म्हणाले, “संचालक मंडळाचा विश्वास आहे की एनव्हिडियाचे नेतृत्व करण्यासाठी जेन्सन हे सर्वोत्तम व्यक्ती आहेत आणि त्यांची पुनर्नियुक्ती आमच्या भागधारकांच्या, कर्मचाऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या हिताची आहे. आम्हाला जेन्सन यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते कंपनीचे नेतृत्व पुन्हा स्वीकारत असताना त्यांच्यासोबत मिळून काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

तसेच मोठ्या वादानंतर एनविडियाचे सीईओ म्हणून पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर जेन्सन हुआंग यांनीही आनंद व्यक्त केला आहे. जेन्सेन हुआंग म्हणाले, “एनव्हिडियामध्ये परत येणे आणि जगातील सर्वात महत्त्वाच्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एकाचे नेतृत्व करणे हा माझा सन्मान आहे. मी ही जबाबदारी मोठ्या नम्रतेने स्वीकारतो. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान दाखवलेल्या सातत्यपूर्ण विश्वासाबद्दल आणि पुनर्विचाराबद्दल मी एनव्हिडियाच्या संचालक मंडळाचे आभार मानू इच्छितो.”

आठवडाभरातच यु-टर्न! 

दरम्यान, जेन्सन हुआंग यांनी १२ नोव्हेंबर रोजी एनव्हिडियाचे अध्यक्ष, सीईओ आणि संचालक मंडळ सदस्यपदाचा राजीनामा दिला, ज्यामुळे १९९३ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीसोबतचा त्यांचा ३३ वर्षांचा संबंध संपुष्टात आला. एनव्हिडियाने म्हटले आहे की, कंपनीच्या आचारसंहिता, मानके आणि सांस्कृतिक नियमांच्या विरुद्ध असलेले त्यांचे वैयक्तिक वर्तन उघडकीस आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू