AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पाणी येईल असं समजून हँडपंपचं हँडल फिरवलं, अन् पाण्याऐवजी निघाली दारू! पोलिसही चक्रावले

घराच्या अंगणातला हँडपंप हा साधारण पाणी काढण्यासाठीच बांधलेला असतो. पण एका घरात असा हँन्ड पंप होता ज्यातून पाणी नाही तर कच्ची दारू बाहेर येत होती. आता हे वाचून तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. वाचा सविस्तर

Video : पाणी येईल असं समजून हँडपंपचं हँडल फिरवलं, अन् पाण्याऐवजी निघाली दारू! पोलिसही चक्रावले
| Updated on: Nov 23, 2026 | 7:57 PM
Share

घराच्या अंगणातला हँडपंप हा साधारण पाणी काढण्यासाठीच बांधलेला असतो. पण एका घरात असा हँन्ड पंप होता ज्यातून पाणी नाही तर कच्ची दारू बाहेर येत होती. आता हे वाचून तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण पोलिसांनी स्वत: च हँडपंपचं हँडल फिरवलं आणि खाली ठेवलेल्या टबमध्ये पाण्याऐवजी दारूची धार सुरू झाली. हे दृश्य पाहून पोलिसांच्याही डोळ्यांवर विश्वास बसेना

हँडपंप दिसायला साधा, पण आतला मामला वेगळाच होता

झाशी जिल्ह्यातील तेजपूरा घुरट गावात 21 नोव्हेंबर रोजी पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारूच्या धंद्याविरोधात छापा टाकला होता. पथक एका घरात तपासणीसाठी पोहोचलं.घराच्या अंगणात एक साधा हँडपंप दिसला. पहिल्यावर पाण्याचा हँडपंप असणार असंच सर्वांना वाटणार. त्यामुळे त्यावर काही कोणाचा संशय येणे शक्यच नाही. पण हुशार अधिकाऱ्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यांनी हँडपंपांचं हँडल चालवायला सुरूवात केली. आता पाणी बाहेर येईल असंच सर्वांना वाटलं होतं. पण झालं भलतंच.पंपातून पाण्याऐवजी कच्ची दारू बाहेर आली. खाली ठेवलेल्या टबमध्ये ती जमा झाली.

असा लावला पोलिसांनी  शोध

आता पोलिंसांनी हँडपंपाची तपासणी केली तेव्हा या सगळ्या जुगाडांचं गुपित उघडलं. घराच्या जमिनीखाली दारू साठवण्यासाठी टँक तयार केला होता. त्याला पाईप जोडूनवर हँडपंप बसवण्यात आला होता. त्यामुळे बाहेरून पाहणाऱ्याला हा नेहमीचा पाण्याचा पंप वाटायचा आणि हँडल फिरवलं की दारू बाहेर यायची. या कारवाईत सुमारे 30 लीटर तयार कच्ची दारू जप्त करण्यात आली.

सोशल मीडियावर भन्नाट चर्चा

या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही या जुगाडावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी याला देसी इंजिनीअरिंग म्हटलं आहे. तर काहींनी असा हँडपंप प्रत्येक गावात असला तर गावकऱ्यांची मज्जाच समजा. दुसऱ्या एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, “जर अंगणात असा हातपंप बसवला, तर परिसरातील दारुडे पाणी भरण्याच्या बहाण्याने रोज सकाळी आणि संध्याकाळी रांगेत उभे राहतील.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, “तुम्ही तुमच्या बुद्धीचा खूप वापर केला होता, पण जेव्हा नशीब खराब असेल तेव्हा कोणीही काही करू शकत नाही.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू