आरोपीचा पोलिस ठाण्यात पोलिसांवरच हल्ला, ९ पोलिस जखमी
राजधानी दिल्ली येथील जामा मस्जिद पोलिस ठाण्यात एका व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याने ५ पोलिस जखमी झाले आहेत.

राजधानी दिल्ली येथील जामा मस्जिद पोलिस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याने ५ पोलिस जखमी झाले आहेत. जखमींना गंगाराम हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. एका व्यक्तीची तक्रार मिळालेली होती की तो त्याच्या आई आणि बहिणीला खूप त्रास देत आहे. या तक्रारीवर कारवाई करत दिल्ली पोलिसांनी आज त्या व्यक्तीला जामा पोलिस टाण्यात बोलावले होते. आणि जेव्हा पोलिस ठाण्यात त्याची चौकशी सुरु असताना त्याने चाकूने हल्लाबोल केला. आरोपीला अटक करण्यात आले आहे. जखमी पोलिसांना दवाखान्यात बंद केले आहे.
दुपारी. २.३० वाजतची घटना
ही घटना सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजताची आहे. नबील नावाच्या या व्यक्तीला पोलिस ठाण्यात बोलावले होते. आरोपी नबील ( ३० ) याने जामा मस्जित पोलिस ठाण्यात आता सब इन्सपेक्टर अजय, सब इन्सपेक्टर अरविंद आणि हेडकॉन्स्टेबल हरेंद्र समेत अशा पाच जणांना चाकू मारुन जखमी केले आहे. पोलिसांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर वार केले आहेत. या हल्ल्यानंतर आरोपी पोलिस ठाण्यात पळून गेला. त्याने पळून जाण्यासाठी एका नागिरकांची स्कूटी देखील हिसकावून धूम ठोकली.
आणखी चार पोलीस जखमी
एएटीएस (AATS) आणि सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्पेशल स्टाफच्या पथकांनी चितली काबरा परिसरात त्या आरोपीला घेरले. पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपीने पुन्हा चाकूने हल्ला करून चार स्पेशल स्टाफ पोलीसांना जखमी केले. यामुळे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या वाढली आहे.
पोलिसांनी आठ गोळ्या झाडल्या
आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी आठ गोळ्या झाडल्या. सर्व गोळ्या कमरेच्या खाली झाडण्यात आल्या. सहा गोळ्या आरोपीच्या पायांना लागल्या. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपी नबील हा कलान महल, जामा मशीद येथील रहिवासी आहे. त्याच्यावर २०२२ मध्ये दरियागंज पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४ अंतर्गत एक गुन्हा दाखल आहे. जामा मशीद आणि चांदनी महल पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून,याचा पुढील तपास सुरू आहे.
