AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात नवी तुळस कधी लावावी? हे तीन दिवस आहेत खूपच खास, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानण्यात आलं आहे. भगवाना विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं तुळस हे अत्यंत प्रिय झाड आहे. मात्र घरात नवी तुळस कोणत्या दिवशी लावावी? याचे देखील काही नियम आहेत. आज आपण त्याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरात नवी तुळस कधी लावावी? हे तीन दिवस आहेत खूपच खास, वास्तुशास्त्र काय सांगतं?
tulasImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 23, 2026 | 7:28 PM
Share

हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र माण्यात येतं. तुळस हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं अत्यंत प्रिय झाड आहे. असं म्हणतात ज्या घरात तुळस असते, अशा घरावर सदैव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद कायम राहतो. अशा घरात कधीही पैशांची कमी भासत नाही. त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा, असं देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र अनेकदा असं होतं की आपल्या घरातील तुळस अचानक वाळून जाते, अशा वेळी वाळलेली तुळस जास्त दिवस कुंडीमध्ये ठेवू नये, त्याजागी तुळशीचं नवं रोप लावावं. परंतु तुळशीचं नवं रोप लावताना देखील त्याचे काही नियम आहे, जसं की ते कधी लावावं? कोणत्या वारी लावावं? जुन्या वाळलेल्या तुळशीच्या रोपाचं काय करावं? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे, आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

तुळस का वाळते?

तुळस वाळण्यामागे अनेक कारण असू शकतात, जसं की तिला अनेक दिवस पानी मिळालं नाही तरी देखील तुळस वाळू शकते. परंतु आपण सर्व काळजी घेऊन देखील तुळस वाळली तर वास्तुशास्त्रानुसार हा एक शुभ संकेत असतो. याचा अर्थ असा होतो की आपल्यावर कोणतं तरी फार मोठं संकट येणार होतं. मात्र हे संकट तुळशीच्या कृपेमुळे टळलं आहे. त्यामुळे तुळस सुकली.

वाळलेल्या तुळशीचं काय करावं?

जर तुमच्याही घरात लावलेली तुळस अचानक वाळली असेल तर घाबरून जावू नये, आपल्यावरील एखादं फार मोठं संकट टळलं असं मानावं. ही वाळलेली तुळस फार काळ कुंडीमध्ये ठेवू नये, ही तुळस पवित्र ठिकाणी वाहत्या पाण्यात विसर्जित करावी, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. जुनी तुळस विसर्जित केल्यानंतर ही कुंडी मोकळी ठेवू नये, त्या जागी लगेच तुळशीचं नवं रोप लावावं. मात्र नवं रोप लावत असताना देखील काही नियम पाळले गेले पाहिजेत. नवं रोप हे नेहमी गुरुवार, शुक्रवार किंवा शनिवार या तीनच दिवशी लावावं, या दिवशी घरात नवी तुळस लावणं शुभ मानलं जातं, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू