AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार गोष्टींची कधीच लाज बाळगू नका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्याची माणसाने कधीही लाज बाळगली नाही पाहिजे.

Chanakya Niti : या चार गोष्टींची कधीच लाज बाळगू नका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 23, 2026 | 7:25 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. माणसाने आयुष्य कसं जगावं, याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्यांना कधीही लाजता कामा नये. तुम्ही जर या गोष्टींची लाज बाळगली तर मात्र तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते. त्यामुळे अशा ठिकाणी कधीही लाज बाळगू नये, त्यातच तुमचं हीत आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

कष्ट – चाणक्य म्हणतात माणसाने कधीही कष्टाला लाजू नये, तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढे जास्त कष्ट कराल तेवढे तुम्ही यशस्वी व्हाल. परंतु जे लोक कष्टाची लाज बाळगतात, असे लोकं आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तिथे तुम्ही प्रचंड कष्ट केलेच पाहिजेत. तर आणि तरच तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्ही जे काम करता, त्याची कधीही लाज बाळगू नका, कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं, काम काम असतं याची जाणीव सदैव राहू द्या, आणि तुम्ही जे काम करता त्यावर प्रेम करा, त्या क्षेत्रात कष्ट करा, तुम्ही करत असलेल्या कामाची कधीही लाज बाळगू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

जेवण – चाणक्य म्हणतात जेवताना कधीही लाजू नये, पोटभर जेवावं. जर तुम्ही जेवताना लाजले तर तुमच्यावर उपाशी राहण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे कधीही जेवताना लाजू नये. मात्र तुम्हाला जेवढी गरज आहे, तेवढंच ताटात अन्न वाढून घ्यावं, अन्नाची नासाडी करून त्याचा अपमान देखील करू नये, असंही चाणक्य म्हणतात.

आर्थिक व्यवहार – चाणक्य म्हणतात तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार केला असेल, एखाद्या व्यक्तीकडे तुमचे पैसे असतील तर असे पैसे मागताना देखील कधीही लाज बाळगू नये, तुम्ही जर लाजलात तर तुमचे पैसे देखील बुडू शकतात.

बोलणं – चाणक्य म्हणतात तुम्ही बोलताना कधीही लाज बाळगली नाही पाहिजे, तुमच्यासमोर कितीही लोकं असू द्या, तुम्हाला बोलता हे आलंच पाहिजे. यातूनच नेतृत्व गुणाचा विकास होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू