AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Facts: हा साप एकदम खतरनाक, शिकारीसाठी करतो मृत्यूचे नाटक, जवळ जातना जरा जपूनच…

Snake Facts: हा साप एकदम खतरनाक आहे. शिकारीसाठी अथवा स्वसंरक्षणासाठी हा साप चक्क मृत्यूचे नाटक वठवतो. तो निस्तब्ध पडून राहतो. शिकार टप्प्यात येताच तो झडप घालतो आणि शिकार करतो. कधी कधी स्वतःचे संरक्षण करतो.

Snake Facts: हा साप एकदम खतरनाक, शिकारीसाठी करतो मृत्यूचे नाटक, जवळ जातना जरा जपूनच...
वठवतो मृत्यूचे नाटक
| Updated on: Oct 10, 2026 | 2:08 PM
Share

काही प्राण्यांमध्ये उपजत कलागुण असतात. पण सापही मृत्यूचे नाटक करतो हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. शिकारीसाठी आणि स्वसंरक्षणासाठी हा साप मृत्यूचे नाटक करतो. होगनोज स्नेक (Hognose Snake) असे या सापाचे नाव आहे. तो मृत्यूचे असे नाटक वठवतो की सावज आपोआप त्याच्या टप्प्यात येते. त्यानंतर तो त्यावर झडप घालतो. त्याची शिकार करतो. कधी कधी स्वत:च्या संरक्षणासाठी तो मृत्यूचे नाटक करतो आणि जीव वाचवतो.

होगनोज सापाची वैशिष्ट्य काय?

या सापाचे नाक डुकाराच्या तोंडासारखे थोडे वरच्या दिशेने वळलेले असते. त्यामुळेच त्याला होगनोज असे नाव देण्यात आले आहे. हा साप विषारी नसतो. पण काही जातीचे होगनोज साप विषारी असतात. पण ते माणसासाठी घातक मानल्या जात नाही. हे साप अत्यंत निरुपद्रवी मानले जातात. सहसा ते कुणालाही चावत नाहीत. पण शिकारीसाठी ते अशा भन्नाट गोष्टी करतात. शिकार जवळ येण्यासाठी मरणाचे नाटक वठवतात. तर कधी कधी स्वतःच्या बचावासाठी नाना क्लृप्त्या करतात.

रानटी मांजर, मोठे साप, पक्षी अथवा मुंगूस यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी होगनोज साप एकदम चपखल नाटक वठवतो. त्याला या प्राण्यांची चाहुल लागताच तो मृत्यूचे नाटक करतो. तो निपचित पडून राहतो. त्याच्यावर कुणी हल्ला करून नये, पाठलाग करू नये यासाठी तो कानोसा घेऊन मृत्यू झाल्याचे नाटक करतो.

पण जर या प्राण्यांनी त्याच्यावर हल्ला केलाच तर मग तो नाटक सोडतो आणि जोरजोराने फुत्कारतो. नागासारखा मोठा फणा काढण्याची कलाही त्याला अवगत आहे. तो प्रत्यक्षात चावत नाही. पण प्राण्यांना घाबरवतो. त्याच्या या अक्राळ रुपाने शिकारी कधी कधी पळून जातो. जर प्राण्याने त्याला सोडले नाही तर मग तो मृत्यूचे नाटक करतो. धोका कमी झाला की तो त्या ठिकाणाहून पळ काढतो.

निसर्गाचे मोठे वरदान

जर शिकारी प्राणी मोठा असेल तर होगनोज सापाला निसर्गाने एक वरदान दिले आहे. त्याच्या शरीरातील क्लोएका या ग्रंथीतून अतिशय घाणेरडा आणि कुजलेल्या मासांसारखा दुर्गंधीयुक्त पदार्थ बाहेर काढतो. हा वास इतका उग्र असतो की त्याने शिकारीसाठी आलेला मोठा प्राणीही धूम ठोकतो अशा प्रकारे हा साप स्वतःचा जीव वाचवतो.

Follow Us
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...
विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; दिपके, सौरभ दास अन्.....
CJP Protest : विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; अभिजीत दिपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका ताब्यात
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल