AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनू निगम यांचा मुलगा दिसतो कसा?, बापासारखा गायक होणार की अभिनेता?, पित्याने पोस्ट करीत केलं लेकाचं कौतूक

गायक सोनू निगम यांचा मुलगा निवान आता मोठा झाला आहे. त्याच्या कामाविषयीची चांगली बातमी खुद्द सोनू निगम यांनी पोस्टद्वारे दिली आहे. बॉलीवूडमध्ये नेपोटिझमचा वाद कायम सुरु असतो. मात्र निवान याने स्वतंत्र कारकीर्द घडवण्याचा चंग बांधला आहे.

सोनू निगम यांचा मुलगा दिसतो कसा?, बापासारखा गायक होणार की अभिनेता?, पित्याने पोस्ट करीत केलं लेकाचं कौतूक
SONU NIGAM AND SON NEVAAN
| Updated on: Nov 25, 2026 | 5:33 AM
Share

प्रख्यात गायक सोनू निगम मध्यंतरी त्यांनी त्यांची सर्जरी सुरु असताना ऑपरेशन थिएटरमध्ये गाणे गाऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. सोनू निगम यांना यंदाची दिवाळी आनंदाची गेली आहे. त्यांनी आपल्या एका पोस्टमध्ये त्यांच्या १९ वर्षांच्या मुलगा निवान याने त्यांची पहली शॉर्ट फिल्म ‘स्लाईड’ द्वारे म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याची बातमी सर्वांना दिली आहे. सोनू यांनी त्यांची पत्नी मधुरिमा निगम सोबत जॉईंट प्रोजेक्ट करत ही खुशखबरी दिली आहे.मुलगा निवान याच्यात गेल्या काही वर्षांपासून झालेल्या बदलासंदर्भात पिता म्हणून सोनू यांनी कौतूकही केले आहे. त्यांनी निवान निगमच्या लहानपणाच्या परफॉर्मन्सपासून त्याच्या पहिल्या स्वतंत्र म्युझिकल प्रोजेक्टची तयारी संदर्भात माहिती दिली आहे.

निवान याच्या म्युझिक डेब्यूवर सोनू निगम हॅप्पी

आपल्या पोस्टमध्ये सोनूने केवळ मुलगा निवानच्या गाण्यांसदर्भात सांगितलेले नाही तर निवानमध्ये झालेले बदल, त्याचे प्रशिक्षण आणि म्युझिक आणि डान्सिंग स्किल्सला चांगले करण्यासाठी घेतलेल्या कठोर मेहनती संदर्भातही मनमोकळे केले आहे. त्यांनी त्यांचा मुलाच्या सुरुवातीच्या परफॉर्मन्सची झलक देखील पेश केली आहे. ज्यात काही असे क्षण होते ज्यात युजरना निवान अवघा चार वर्षांचा असतानाचा व्हिडिओ पाहायला मिळतोय.

निवानचा म्युझिक डेब्यू

सोनू निगम यानी पोस्टमध्ये निवानच्या आत्मविश्वासाबद्दलच्या प्रगती संदर्भात सांगितले आहे. ते म्हणतात की एक वेळ अशी होती जेव्हा त्यांचा मुलगा पप्पा समोर गायला देखील लाजायचा आणि आज तो व्होकल कोचसोबत काम करत आहे. निवानची तयारीत डान्स रिहर्सल आणि फिटनेस रुटीनचा देखील समावेश आहे.

सोनू निगमची पोस्ट

सोनू निगम यांनी त्यांच्या 19 वर्षांच्या मुलगा निवान याच्या बॉलीवुड डेब्यू संदर्भात पोस्ट केलीय-, “दिवाळीच्या या शुभ आणि पवित्र मुहूर्तावर निवान संगीतविश्वात आपल्या कारकिर्दीची नवी सुरुवात करीत आहे. निवान याने स्वतःचा एक नवा मार्ग शोधण्यासाठी आजोबा आणि वडिलांपेक्षा वेगळी वाट निवडली आहे. एका गुबगुबीत मुलापासून ते एका सडपातळ तरुणात त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.जो मुलगा पप्पा समोर गायला देखील लाजायचा आणि आज तो व्होकल कोचकडून शिकवलेल्या गाण्यांचा सराव दिवसातील तब्बल 16 तास करत आहे. इतकेच नव्हे तर दिग्गज संगीतकार ‘पू बेअर’ (Poo Bear) यांच्यासोबत स्टुडिओमध्ये एकाच टेकमध्ये अप्रतिम रेकॉर्डिंग करत आहे.”

4 वर्षांचा असताना गायन

सोनू निगम यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की , जो मुलगा कधी तीन मिनिटांच्या जॉगिंगमध्येही थकायचा, तो आज आपल्या कौशल्याला तावून सुलाखून सिद्ध करण्यासाठी तासनतास डान्सची प्रॅक्टीस करत आहे. निवानने आमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप आनंद दिला आहे. चार वर्षांचा असताना स्टुडिओत ‘कोलावेरी डी’ गाणे म्हणण्यापासून ते साडे चार वर्षांत स्टेजवर ‘अभी मुझमें कहीं’गाण्यापर्यंत, निवानला तुम्हा सर्वांकडून एवढे प्रेम मिळाले आहे की, तो खरोखरच भाग्यवान आहे.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी